देऊळगाव राजा (प्रतिनिधी)
Nile pratik news network
रोलर ॲथलॅटिक मिनी स्टेट चॅम्पॅनशिप २०२४ या स्केटिंग स्पर्धा प्रथम कोल्हापुर येथे
रोलर ॲथलॅटिक मिनी स्टेट चॅम्पॅनशिप २०२४ या स्केटिंग स्पर्धा प्रथम आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये ॑ स्वराज्य रोलर स्केटिंग ॲकॅडमी उजळाईवाडी व गडमुडशिंगी मधील मुलांनी घवघवीत यश संपादन केले, यामध्ये बिगिनीयर स्केटिंग प्रकारात आडगाव राजा तालुका सिंदखेड राजा येथील सौ . रमा लहू काळे यांचा नातू व सौ. पल्लवी प्रशांत काळे यांचा मुलगा कु . सिद्धार्थ प्रशांत काळे २ सुवर्ण, यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर
कशिंवाश संतोष चुन्नामुरी रौप्य, हर्षित महेश गुरव कांस्य, स्पीड क्वाड स्केटिंग प्रकारात हर्ष विजय जाधव १ सुवर्ण व स्पीड इनलाइन स्केटिंग प्रकारात स्वरा उमेश दोडमणी २ सुवर्ण अशी उत्तम कामगीरी करण्यात आली,या स्पर्धा २०० व ४०० मीटर मध्ये घेण्यात आल्या या सर्वांना स्वराज्य रोलर स्केटिंग ॲकॅडमी च्या NIIS राष्ट्रीय प्रशिक्षिका सौ.शुभांगी कांबळे मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले तसेच सर्व पालक व ॲकॅडमीचे अध्यक्ष श्री. विजय जाधव सर व सदस्य यांचे सहकार्य लाभले.