छत्रपती संभाजीनगर ( निळे प्रतिक न्यूज नेटवर्क ):प्रेमाचा विरोध, जातीय भेद दूर करत तिच्या जिद्दीने तिने आंतरजातीय विवाह केला, पण लग्नानंतर सुरू झालेल्या छळामुळे आता तिला पतीसह सासरच्या ६ जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली आहे.
२७ वर्षीय विवाहितेने सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, तिचे सासर परभणी जिल्ह्यातील मानोली येथे आहे. तिचा पती, सासू, दीर, जाऊ, आणि नणंद यांनी तिच्या जातीवरून टोमणे मारत हुंड्याची मागणी केली. शेती मिळवण्यासाठी दबाव आणला, आणि ती नकार देताच शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.
सासरच्यांच्या छळामुळे विवाहितेला घराबाहेर काढण्यात आलं. काही दिवसांनी पती परतला, मात्र त्याच्या फोनमध्ये दुसऱ्या मुलीसोबतचे फोटो पाहून ती हादरली. विचारल्यावर पतीने शिवीगाळ केली. विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास महिला पोलीस अंमलदार विमल पवार करत आहेत.