छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी, दि. २१ चालू घडामोडींमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मंत्रीपदावर मा. ना. संजय शिरसाठ यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे अनुसूचित जाती, आदिवासी, वंचित आणि मागासवर्गीय समाजाच्या हितासाठी काम करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.
संजय शिरसाठ हे शिवसेना पक्षाचे (शिंदे गटाचे) प्रमुख नेते असून, त्यांनी आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत समाजहितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांच्या कामाचा मुख्य भर वंचित समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणे आणि गरजूंना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे यावर राहिला आहे.
त्यांच्या या नेमणुकीबद्दल समाजातील अनेक कार्यकर्ते आणि नेते मंडळींनी आनंद व्यक्त केला आहे. अनुसूचित जाती व वंचित समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या नेमणुकीकडून मोठ्या अपेक्षा आहेत.