छत्रपती संभाजीनगर, दि. २१ डिसेंबर:
कैलासनगर येथील रहिवासी पांडुरंग कांतीलाल पाटकुले गंभीर स्वरूपाने जखमी झाला आहे. आज सकाळी शाहनूर मिया दर्ग्याकडून जवाहर कॉलनीकडे जात असताना रस्त्यावर अडकलेला मांजा त्यांच्या गळ्याला अडकल्यामुळे हा अपघात घडला.अपघातामुळे त्यांच्या गळ्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी हेगडेवार रुग्णालय, औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.रस्त्यावर अडकलेल्या मांजामुळे होणारे अपघात चिंताजनक बनले आहेत. प्रशासनाकडून मांजाच्या वापरावर कारवाईसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.