छत्रपती संभाजीनगर,
चळवळीतील नेते माजी राज्यमंत्री
पँथर गंगाधर गाडे यांच्या पार्थिवावर हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उस्मानपुऱ्यातील नागसेन विद्यालयाच्या परिसरात गाडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. पोलिसांनी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. त्यानंतर, समता सैनिक दलानेही मानवंदना दिली. डॉ. सिद्धांत गाडे यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. प्रा. जोगेंद्र कवाडे, खा. इम्तियाज जलील, माजी खा. चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, माजी आ. किशोर गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती.
पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गंगाधर गाडे यांचे दीर्घ आजाराने शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी रीघ लागली होती. विद्यापीठ नामांतर लढ्याचे ते प्रणेते होते. त्यामुळे दुपारी १२:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
भिक्खू संघाने केला विधी
नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या चबुतऱ्यावर भन्ते धम्मज्योती, भन्ते नागसेनबोधी, भन्ते डॉ. चंद्रबोधी, भिक्खुणी धम्मदर्शिना, तसेच जपानच्या बौद्ध भिक्खूने बुद्धवंदना व सूत्रपठण केले. यावेळी सूर्यकांता गंगाधर गाडे, चिरंजीव डॉ. सिद्धांत गाडे, सून डॉ. भावना गाडे, बहीण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई आदींची उपस्थिती होती.
विद्यापीठ गेटसमोरील शहीदस्तंभाजवळ व त्यानंतर भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सजविलेल्या रथावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले. भरउन्हातही हजारो अनुयायांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. तेथून पुन्हा नागसेन विद्यालयात मंडपामध्ये पार्थिव ठेवले. खा. चंद्रकांत हंडोरे, खा. डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, उपायुक्त नितीन बगाटे यांनी पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केले. सुभाष लोमटे, प्रा.राम बाहेती, अंकुश भालेकर, मिलिंद शेळके, बाबूराव कदम, प्रकाश निकाळजे, रतनकुमार पंडागळे, बी.एच. गायकवाड,एन डी जिवणे, अमित भूईगळ, पी बी अंभोरे एम. एन. ढाकरगे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले.