छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क):महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा रविवार, २९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच परीक्षा केंद्रांवर १६५६ उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून परीक्षेच्या व्यवस्थेसाठी २१० अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षा सकाळी १०:३० ते १२:०० या वेळेत होणार आहे.
परीक्षा केंद्रे व परीक्षार्थींची संख्या:
1. मौलाना आझाद कॉलेज (सायन्स बिल्डिंग): 312
2. मौलाना आझाद कॉलेज (टॉम पॅट्रीक बिल्डिंग): 288
3. एमजीएम जवाहरलाल नेहरू इंजिनिअरींग कॉलेज: 408
4. एमजीएम पॉलिटेक्निक, सिडको: 288
5. शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय, विश्वासनगर: 360
परीक्षार्थींसाठी महत्त्वाच्या सूचना:
परीक्षेसाठी उमेदवारांनी आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड स्वरूपातील ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
परीक्षा कक्षात केवळ प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या किंवा निळ्या शाईचे बॉल पेन आणि ओळखपत्राची प्रत नेण्याची परवानगी आहे.
मोबाईल, ब्लूटूथ, कॅमेरा, डिजीटल डायरी, किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्राच्या आवारात नेण्यास मनाई आहे.
परीक्षा केंद्राच्या मुख्य दरवाजाबाहेरच अशा वस्तू ठेवल्या जाव्यात; आयोग याची जबाबदारी स्वीकारणार नाही.
निर्धारित वेळेनंतर परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.