छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी ) सतत १५ वर्ष साप्ताहिक “निळे प्रतीकने आपली यशस्वी अखंडित वाटचाल सुरु ठेवत समाजात विस्वास विश्वासार्हता जपली आहे. जनमानसात आपले स्थान बळकट केले आहे. मागास,वंचित घटकावर होणाऱ्या विविध प्रकारच्या अन्याय अत्याचारी घटनांना साप्ताहिक निळे प्रतीक मधून वाचा फोडली. या साप्ताहिक वृत्तपत्राचे रूपांतर दिनांक ०२मे २०२४ रोजी दैनिकात झाले आहे.”निळे प्रतीक या दैनिकाचा प्रथम अंकाचा प्रकाशन सोहळा शहरातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत थाटामाटात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस एस.भगत (अधीक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,औरंगाबाद ) यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे उद्घाटक मिलिंद थोरात (अध्यक्ष,इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर अँड ट्रेडर्स असोसिएशन,औरंगाबाद) अशोक येरेकर (कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,औरंगाबाद) अशोक सिरसे (ग्रामीण प्रकल्प संचालक,जिल्हा परिषद,औरंगाबाद) नंदकुमार भोंबे (मुख्याधिकारी,कन्नड) रवींद्र जोगदंडे (उपायुक्त, महानगरपालिका औरंगाबाद) बालाजी सोनटक्के (सेवानिवृत्त,सहायक पोलीस आयुक्त,औरंगाबाद) दुष्यंत आठवले(उद्योजक,औरंगाबाद) पुज्य.भदंत संघपाल थेरो, डॉ. वासुदेव मुलाटे (ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत ) पी. बी. अंभोरे (अध्यक्ष, डॉ. आंबेडकर नागरी सहकारी बँक ) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विचार मंचावरून मान्यवरांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे उदघाटक,मिलिंद थोरात यावेळी म्हणाले की, समाजाच्या मूलभूत प्रश्नांना एरणीवर आणणारे, वंचितांना न्याय देणारे वृत्तपत्र म्हणजे निळे प्रतीक आहे. आजच्या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याची भाग्य मला लाभले. दैनिक, वृत्तपत्र चालवणे अत्यंत कठीण काम आहे आपण सर्वांनी या वृत्तपत्राला साथ देणे गरजेचे आहे.असे आवाहन त्यांनी यावेळी केले.अशोक सिरसे म्हणाले की, दैनिक निळे प्रतीकला समाज मोठ्या मनाने आज मदत करेल,परंतु ही मदत किती दिवस करेल?म्हणून वृत्तपत्र प्रोफेशनल रित्या चालवावे, उत्तम नियोजन करावे, प्रत्येक वेळी समाजाचा टेकू लागणार नाही,असं नियोजन करावे. आपले वृत्तपत्र वाचकांच्या घरी कसे पोहोचेल याचे सुध्दा नियोजन आपल्याला करावे लागेल असे ते म्हणाले.यावेळी अशोक येरेकर म्हणाले की, दैनिक चालवणे अत्यंत अवघड काम आहे, हे मान्य आहे.परंतु आंबेडकरी चळवळीची लोकं सोपे काम न करता कठीण काम करण्यातच अग्रेसर असतात. हे देखील आपण मान्य केले पाहिजे.असे रोखठोक प्रतिपादन अशोक येरेकर यांनी केले. दैनिकाची वाटचाल कठीण आहे,हे खडतर आवाहन संपादक रतनकुमार हे पेलतील.असा आम्हाला या ठिकाणी विश्वास वाटतो. कठीन कामातून आपला पुरुषार्थ आणि कस लागतो. ५०० महारानी २८ हजार पेशव्याना संपवले. त्याचप्रमाणे अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्यासाठी लोकांना जागृत करणे अत्यंत गरजेचे आहे.आणि ते काम दैनिक निळे प्रतिक करेल.या कामासाठी लागणारी ऊर्जा, आर्थिक सहकार्य आम्ही समाज म्हणून नक्कीच करू.आज संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे. परंतु आम्ही काही करू शकत नाही.ही खंत देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली.अनेक वृत्तपत्र आली आणि गेली त्या वृत्तपत्रा विषयी आपण बारकाईने अभ्यास केला तर,आपले वर्तमानपत्र हे नक्की यशस्वी होईल. आज कोणतेही वृत्तपत्र हे हुकूमशहाच्या विरोधात बोलायला तयार नाही. बाबासाहेबांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजाला जागवण्याचे कार्य केले. तेच काम पुढे दै.निळे प्रतिकला प्रामाणिकपणे करायचे आहे. हे ध्येय उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सामर्थ्य रतन कुमार साळवे यांच्यामध्ये आहे. याची आम्हाला जाणीव आहे. नागसेनवनातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आपण जबाबदारीने बोलत आहोत. इथं उपस्थित असलेलेले भीमसैनिक आणि समाज दैनिक निळे प्रतीकच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहील. विचार पिठावरील मान्यवर सुद्धा आपल्या पाठीशी उभे आहे.नंदकिशोर भोंबे म्हणाले की, निळे प्रतीक हे वृत्तपत्र कोणाचे भाट होऊ नये. त्यांनी प्रखडपणे आपली भूमिका मांडावी. मी निळे प्रतीकचा टोकाचा संघर्ष पाहिलेला आहे. अत्यंत खडतर अवस्थेतून त्यांनी आपल्या साप्ताहिकातून वाटचाल सुरू केली आहे.आणि आज ते वृत्तपत्र, दैनिक निळे प्रतिक या रूपाने आपल्यासमोर उभे ठाकले आहे. त्यांचे धैर्य,जिद्द वाखानन्याजोगी आहे. आजच्या अंकामध्ये जयश्री भगत यांचा,माध्यमांची भाटगिरी, हा लेख मी वाचला. अशाच प्रकारे सडेतोड लिखाण जर आपण आपल्या वृत्तपत्रातून करत राहिले. तर एक वाचक वर्ग आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील. आज आम्हाला अभिमान आहे की, एक छोट्याशा गावातून आमचा मित्र शहरात येऊन एक साप्ताहिक चालवतो आणि त्या साप्ताहिकाचे रूपांतर आज दैनिकात होत आहे.ही निश्चितच आमच्यासाठी स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी काल होतो, आजही आहे,उद्या पण राहू ही ग्वाही या ठिकाणी देतो.असे ते म्हणाले. यावेळी बालाजी सोनटक्के म्हणाले की, समाजाला योग्य दिशा देण्याचे काम निळे प्रतीक हे करत आहेत. निश्चितच हे काम अतिशय कौतुकास्पद आहे असे आम्हाला वाटते. आजचा अंक हा अत्यंत प्रभावशाली आणि दर्जेदार आहे. निळे प्रतिक ने आपला वर्तमानपत्राचा दर्जा असाच ठेवावा. सरकारला धारेवर धरण्याची हिम्मत निळे प्रतिकने दाखवावी अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. प्रामाणिक काम करत राहिले तर समाज आपल्याला नक्कीच साथ देईल यात शंका नाही.एस. एस.भगत म्हणाले की, वयाच्या ५०व्या वर्षांमध्ये रतनकुमार साळवे यांनी आपल्या पत्रकारितेचे अवलोकन करून साप्ताहिकाचे दैनिकात रुपांतर करण्याचा संकल्प केला आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. अनेक वर्तमानपत्रे आली आणि गेली. त्यांच्या अयशस्वीतेची कारणे शोधल्यास आपण सुद्धा यशस्वी होऊ. दैनिक चालवायचे असेल तर तुम्हाला ते केवळ सामाजिक म्हणून नाही तर ती व्यवसायीक म्हणून सुद्धा तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आमच्या कार्यालयामध्ये अनेक साप्ताहिक वृत्तपत्र येत असतात. त्यांची अधिकाऱ्या विषयी खालच्या पातळीची भाषा, विविध कार्यालया विषयी असलेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या, बघून असे वाटते की आता हीच पत्रकारिता शिल्लक राहिली आहे काय? अशी त्यांनी व्यक्त केली. निळे प्रतीकसह अन्य काही वर्तमानपत्र त्याला अपवाद आहेत. निळे प्रतिकचे आतापर्यंतचे एकूण कार्य बघितले, त्यांचे अंक बघितले तर ते वाचनीय असतात. असेच कार्य त्यांनी केले तर एक आघाडीचे दैनिक म्हणून निळे प्रतिक समोर येईल. यामध्ये अजिबात शंका नाही. समाजाचा आरसा म्हणून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी करावे,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाचे प्रस्तविक करतांना संपादक रतनकुमार साळवे यांनी आपल्या एकूणच १५ वर्षाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले प्रामाणिकपणे काम करत आसल्यामुळे आम्ही समाजाचा विस्वास संपादन केला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आमची निष्ठा आहे.हीच आमची पत्रकारीता आहे. त्यामुळे साप्ताहिकाप्रमाणे दैनिक देखील यशस्वी होईल. जनता आम्हाला स्वीकारेल असा आत्मविस्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी हायकोर्टाचे अँड.डी.व्ही. खिल्लारे, क्राईम ब्रँचचे पी.एस,आय. कल्यान शेळके, नाशिकचे नगरसेवक विलास कटारे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या वेळी धनराज गोंडाने, एन डी जिवणे, प्रा. भारत सिरसाट, अनंत भवरे, संतोष नवतुरे, हिराबाई खरात विद्या पगारे, डॉ. प्रज्ञा साळवे, प्रा. देवानंद वानखेडे, अंबादास रगडे, जितेंद्र भवरे, सविता अभ्यंकर, रामदास अभ्यंकर, गंगाताई सुरडकर, राहुल साळवे, अमित वाहूळ,विजय शिंदे, प्रल्हाद गवळी, वीर गुरुजी, समता सैनिक दलाचे पदधिकारी,नाशिकचे नगरसेवक कटारे, व्ही के वाघ, किशोर गडकर, अँड. जयश्री भगत, पी.एस.आय.अंकुश पंडित, एकनाथ पाखरे, आदीसह वाचक, जाहिरातदार, हितचिंतकानी मोठी गर्दी केली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतीक साळवे, राहुल गवळी, सागर साळवे, प्रशांत घुसळे, सोनू पवार,संकेत साळवे, अंश पवार,शारदा पगारे,कारभारी त्रिभुवन,समता सैनिक दलाचे सर्वं कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी केले तर आभार प्रतीक साळवे यांनी मानले.