निळे प्रतीक न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा, आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे १७ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३ वा संयुक्त जयंती समारोह घेण्यात आला. यावेळी व्याख्यानातून महापुरुषांचे कार्य, त्याचा संघर्षमय इतिहास सर्वांसमोर उलगडला.चिकलठाणा विमानतळावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने या समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विमानतळाचे संचालक शरद येवले होते. प्रमुख वक्ते म्हणून शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंदगायकवाड उपस्थित होते. विमानतळ येथे सर्व राज्यांचे, विभिन्न धर्म, पंथांचे लोक कार्यरत असतात. सर्वांना पटेल, अशा विचारांची मांडणी करून डॉ. गायकवाड यांनी विचार करण्यास प्रवृत्त करणारे प्रबोधन केले. शरद येवले यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.सी.एस.टी. एम्प्लॉइज वेल्फेअर असोसिएशनचे रवींद्र टेंभूर्णे, नितीन मेश्राम, योगेश क्षीरसागर, रेखा पवार, वैशाली अंडे, निरंजन बोधले, विश्वानंद ठोंबरे, हिमांशू चव्हाण, अनिल आढावे, सर्जेराव ससाणे, महेंद्र पाडमुख, श्रीमंत साळवे आदींनी परिश्रम घेतले. सहमहाव्यवस्थापक विजय कोरडे यांनी आभार मानले.