छत्रपती संभाजीनगर आज {प्रतिनिधी } दि.१४ रोजी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बुलंद छावाचे संस्थापक सुरेश जी वाकडे काका, उद्योजक मनोज गायके पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हनवते व युवा उद्योजक उमेश वाकडे पाटील,तरुण महाराष्ट्राचे संपादक रविंद्रजी सुरडकर, अनिल तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुभद्राबाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामदास गायकवाड यांनी आभार मानले .