छत्रपती संभाजीनगर : दि १९ सिडको एन-६,संभाजी कॉलनी परिसरातील महापालिकेच्या शाळेची इमारत साई नॉलेज सोल्युशनच्या द वर्ड स्कूल या खासगी शाळेला भाडेतत्त्वावर दिलेली असून, ४० वर्षे जुन्या इमारतीवर नवीन मजल्याचे बांधकाम शाळेने केले आहे. ही इमारत अगोदरच जीर्ण असून, स्लॅब कोसळण्याची भीती आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी न घेता बांधकाम केल्यामुळे शाळेवर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (सचिन खरात) गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण तसेच शिक्षण अधिकारी (माध्यमिक)मधुकर देशमुख यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे की, शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी न घेता इमारतीवर बांधकाम केले व त्यावर साहित्य, पत्रे, बल्ल्या, विटा, सिमेंट आणून ठेवले आहे. 40 वर्षे जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ती अतिरिक्त वजन पेलण्यास सक्षम आहे का, हेही तपासणे आवश्यक आहे. मुंबईतील घाटकोपर होर्डिंग वडाळयातील टॉवर वादळी वाऱ्यामुळे कोसळल्याने जीवित हानी झाली आहे. सद्याचे राज्यातील हवामान बघता या शाळेतील विद्यार्थ्याची सुरक्षितता महत्वाची आहे. शिवाय शाळेने विना परवानगी दोनदा स्थलांतर केले आहे. लाखो रुपये डोनेशन घेऊन विद्यार्थी प्रवेश घेतात नर्सरी प्रवेशासाठी डोनेशन व्यतिरिक्त, ॲक्टीविटी, गणवेश, शालेय साहित्य वस्तू भांडार, संगणक, स्नेहमिलन, यासाठी वेगळे पैसे घेतले जातात येवढे पैसे देऊनही विद्यार्थी असुरक्षित आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखणे हि जवाबदारी शाळेबरोबर शिक्षण अधिकारी व महाराष्ट्र शासनाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतरत्र शाळेची सुविधा करून द्यावी व द वर्ड स्कूल वर कारवाई करून मान्यता रद्द करावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे याची सही आहे. यावेळी आकाश साबळे, उपस्थित होते…
शाळांनी आकारलेले अन्य शुल्क
- डोनेशन : ५ हजार ते १ लाख रुपये
- प्रवेश अर्ज: ५०० ते दोन हजार रुपये
- गणवेश : ७०० ते ९०० रुपये
- बूट : ३०० ते ४०० रुपये
- पुस्तके : ५,५८५ ते ८,९२५ रुपये
- शाळेचे ॲप : ४ हजार रुपये
- विद्यार्थी सुरक्षा : ३ हजार रुपये
- ट्यूशन फी : २० हजार ते १. ८८ लाख रुपये (नर्सरी ते पाचवीपर्यंत)
•ॲक्टीविटी फी : १० ते १५ हजार.