छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) दि.१९
सर्वधर्म जयंती उत्सव महासंघाच्या वतीने दि. १५ मे रोजी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या २० व्या स्मृतीदिनी अभिवादन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत उत्कृष्ठ देखाव्यात प्रथम आलेल्या शाक्यपुत्र झांज ढोलपथक भोईवाडा व साहेब प्रतिष्ठाण यांना प्रथम व द्वितीय पारितोषीक देवून सन्मानित करण्यात आले. तापडिया नाट्यगृह निराला बाजार येथे झालेल्या कार्यक्रमात, सुरुवातीला प्रमुख अतिथी प्रा. प्रल्हाद लुलेकर, अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर, मधुकरराव भोळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.प्रस्तावित करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत शिस्तीत व त्यांनी केलेल्या संघर्षमय चळवळीत आंदोलने व दिलेल्या तत्वावर सामाजिक प्रबोधन होईल असे सजीव, निर्जीव, ऐतिहासिक घटनेवर आधारीत देखावे सादर करणाऱ्या संघास गेल्या पाच
वर्षापासून पारितोषिक दिले जात आहे. याही वर्षी डि.जे. चा वापर न करता वरील दोन
संघांना दिवंगत शंकरराव भोळे यांच्या स्मृती पित्यार्थ प्रमुख अतिथी अध्यक्ष, मुख्य निमंत्रक यांच्या हस्ते अशोकचक्र स्तंभ देवून सन्मानित करण्यात येत आले.वरील पुरस्कार लक्षात घेता जयंतीच्या मिरवणुकीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार (डी.जे.वर नाच करणे) न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची जयंती सन म्हणून साजरी करावी असे मधुकर भोळे प्रास्ताविकात म्हणाले . प्रमुख वक्ते प्रल्हाद लुलेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना समावून घेणारी आणि सर्वांना समान दर्जा देणारी, राज्य घटना देशाला दिली हे न विसरता सांगितले जात होते. मात्र दलितांचे कैवारी, दलितांचे नेते आहेत. हे अधिउंच स्वरात आणि वारंवार ऐकविले जात होते. परंतु सर्वकष समाज परिवर्तनाचा ध्यास घेणारे आणि सर्व भारतीयांना समान दर्जा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कैवारी दलितांचे नेते नाहीत तर ते सर्व समाजाचे या देशाचे नेते आहेत. अशा महामानवाची जयंती वेळेत व शिस्तित होवून नुसता जयजयकार करुन चालणार नाही तर त्यांनी दिलेले तत्व अंगीकारावीत असे अवाहन केले आहे. त्यावेळी द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. या कार्यक्रमात मराठवाड्यातील नामवंत कवि, गायक पंचशिला भालेराव, प्राध्यापक किशोर वाघ, अजय देहाडे, अमोल जाधव, संगीता धनेधर, सजन रोकडे, वीर गुरुजी, शाहीर उत्तमराव म्हस्के, शाहीर संभाजी गायकवाड, रमेश भालेराव या कवि गायकांनी गित गाऊन वामनदादा यांना अदरांजली वाहिली.सर्व गायक व कविना जयंती महासंघाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. पिसोटे यांनी केले,अॅड. नरहरी कांबळे यांनी आभार मानले.
यावेळी महासंघाचे सलिम शहा, श्रीरंग इंगळे, अॅड. दिपक म्हस्के, भिकन गवळी, रामदास नाडे, रवी नाडे इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.