निळे प्रतीक न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी )दि.१९
संबोधी अकादमी, महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी १९ मे २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील बुध्द लेणीच्या प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगल परिणय विधी पुज्य.भदंत विशुध्दानंद बोधी महास्थवीर व भिक्खू संघ यांच्या हस्ते होईल. संबोधी अकादमीच्या परभणी येथील विवाह सोहळ्यात आजपर्यंत २००० पेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर येथे मागील वर्षी झालेल्या विवाह सोहळ्यामध्ये १२५ विवाह झाले आहेत. या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कन्यादान योजनेंतर्गत वीस हजार रुपयांचे अनुदान मिळेल. यासाठी वधू,वर यांचा प्रथम विवाह असावा,अशी वाट आहे. तसेच संबोधी अकादमीच्या वतीने वधू-वरांना शुभ्र वस्त्र, सर्वांना सुरुची भोजन, वाजंत्री आदी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन संबोधी अकादमी, बोधीधम्मो यांनी केले आहे.