दि.१५ में रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे प्रशाळेतील डॉ. आंबेडकर विचारधारा विभागास प्राध्यापक डॉ. आनंदा काळबांडे यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विभागातील अभ्यासक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच या अभ्यासक्रमासाठी असणारी प्रवेश पात्रता, आज पर्यंत झालेले संशोधन, विविध उपक्रम याबाबत विभागातील सहाय्यक प्राध्यापक, डॉ विजय घोरपडे यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर आंबेडकर विचारधारा या विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आपण पाठवाल अशी अपेक्षाही डॉक्टर घोरपडे यांनी डॉ. काळबांडे यांच्याकडे व्यक्त केली.
या अभ्यासक्रमासाठी आपण प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निश्चित प्रयत्न करू असे आश्वासनही प्राध्यापक काळबांडे यांनी दिले.
यावेळी डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. राकेश रामटेके सर यांच्या वतीने डॉ. विजय घोरपडे यांनी प्राध्यापक डॉ. आनंदा काळबांडे यांचे ‘ प्रा डॉ म सु पगारे यांनी संपादित केलेला आणि विद्यापीठाने प्रकाशित केलेला आंबेडकरी वैश्विक जाणिवेचा जागर ‘ हा ग्रंथ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.