ॲड. प्रकाश आंबेडकरांनी रुग्णालयात घेतली भेट
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे बौद्ध समाजातील कार्यकर्ते आणि कल्याण ग्रामीणचे उमेदवार विकास इंगळे यांना दिवा शहरात शिंदे गटातील एका गुंडाकडून मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी इंगळे याची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.