मुंबई, १८ डिसेंबर २०२४: गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटा लेण्यांकडे जाणाऱ्या ‘नीलकमल’ या प्रवासी बोटीला आज अपघात झाला. बोटीवर ८० प्रवासी होते, त्यापैकी ६६ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर ३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, इंडियन नेव्हीच्या वेगवान बोटीने नियंत्रण गमावल्याने ‘नीलकमल’ बोटीला धडक दिली आणि हा अपघात झाला. उरण जवळील कारंजा येथे ही दुर्घटना घडली.
नौदल, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बचावकार्य वेगाने सुरू आहे. हेलिकॉप्टर आणि स्पीडबोटींच्या सहाय्याने अद्याप हरवलेल्या प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे, तसेच जखमी प्रवाशांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या घटनेतील पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटवर लक्ष ठेवा.