छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूस नेटवर्क): जालना रोडवरील इंडियन बँकेसमोर उभ्या असलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरली. ही घटना मंगळवारी (१७ डिसेंबर) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कुंभेफळ येथे घडली.
कवडगाव येथील प्रगतशील शेतकरी आणि माजी सरपंच अरुण गव्हाड यांनी इंडियन बँकेतून एक लाख वीस हजार रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी कारमध्ये ठेवलेल्या बॅगेत ठेवली होती. काही कामानिमित्त कुंभेफळ फाट्यावर गेल्यानंतर, चोरट्याने कारच्या मागील उजव्या बाजूची काच फोडून बॅगमध्ये ठेवलेली रक्कम लंपास केली.
घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून करमाड पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी पाहणी केली असून चोरट्याचा शोध सुरू आहे.