.बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलडाणा येथील सुप्रसिध्द डॅा. अरूण खासबागे यांच्या स्मृती पीत्यर्थ सन 2014 पासून स्वर्गीय डॉक्टर अरुण खासबागे स्मृती प्रतिष्ठान बुलढाणा च्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात सेवाभाव जपून रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टरांना डॉक्टर अरुण खासबागे मानव सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी ची प्रेरणा तरुण समाजाला व डॉक्टरांना मिळावी तसेच रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे हा संदेश रूढ व्हावा यासाठी स्वर्गीय डॉक्टर खासबागे स्मृती प्रतिष्ठान दरवर्षी 8 जानेवारी रोजी डॉक्टर खासबागे यांच्या जयंती निमित्त हा पुरस्कार वडिलांची आरोग्य सेवेची या त्यांच्या सेवाभावी स्वभावाची आठवण राहावी म्हणून हा आरोग्य सेवेचा पुरस्कार त्यांचे मुले बुलडाण्याचे दंत्त रोग तज्ञ आशिष खासबागे व प्रा.प्रेम खासबागे वितरीत करीत असतात.
या वर्षी या पुरस्काराचे हे 11 वे वर्ष असून या निमित्ताने तीन दशकाहून अधिक नेत्ररोग तज्ञ म्हणून सेवा देणारे बुलडाण्याचे नेत्रतज्ञ डॉक्टर सुभाष मुरलीधर जोशी व चार दशकाहून अधिक वैद्यकीय सेवा देणारे व चिखली येथील जनरल प्रॅक्टिस तज्ञ असलेले डॉ.दत्ता गणपत भराड यांना गौरविण्यात येणार आहे डॉक्टरांनी केलेल्या प्रदीर्घ सेवेचा सन्मान व्हावा हा या मागचा हेतू असून सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ असून मान्यवरांच्या उपस्थित स्थानिक हॉटेल द्वारका मलकापूर रोड बुलढाणा येथील सभागृहात पुरस्कार वितरित करण्यात येईल. सदर पुरस्कार वितरण इंडियन मेडिकल असोसिएशनचे बुलढाणाचे अध्यक्ष डॉ अजित शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बोथरा डायग्नोस्टिकचे संचालक डॉक्टर संजय बोथरा व बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.