( निळे प्रतीक न्यूज नेटवर्क )- पोलीस ठाणे पाचोड येथे दिनांक ०८/१२/२०२४ रोजी गुरनं. ४९५/२०२४ कलम ३३१(३), ३०५ भारतीय न्याय संहिता फिर्यादीनामे विष्णू कैन्हयालाल थोरे वय ५६ वर्ष रा. घारेगांव ता. पैठण यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये अज्ञात आरोपीताने त्यांचे घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम व दागीने असा १,५६,०००/ रूपयांचा मुददेमाल चोरून नेला म्हणून अज्ञात इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच पोस्टे पाचोड येथे दिनांक ०९/१२/२०२४ रोजी फिर्यादी नामे अनिरुध्द भागवत दौंड वय २९ वर्ष, रा. पारूंडी ता. पैठण यांचे फिर्यादी वरून गुरनं. ४९७/२०२४ कलम ३३१(३), ३०५ भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात इसमांने फिर्यादीचे घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून ७०,०००/- रूपये किंमतीची रोख व दागिने चोरी करून नेले म्हणून गुन्हा दाखल झालेला होता.
नमूद गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉ. विनयकुमार मे. राठोड यांचे व अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्था.गु.शा सतिष वाघ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास नमूद गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद गुन्हयातील आरोपीतांची गोपनीय बातमीदार यांचे माहिती वरुन ईमस नामे बंटी टाबर चव्हाण वय २७ वर्ष, रा. म्हारोळा, ता. पैठण यास मोठ्या शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यास वर नमूद गुन्हयाचे अनुषंगाने विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांने नमूद गुन्हे केल्याची कबूली दिली आहे. नमूद आरोपीस पोस्टे पाचोड यांचे ताब्यात पुढील तपासकामी हजर करण्यात आले असून सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री.डॉ. विनयकुमार मे. राठोड, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. सुनिल लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सतिष वाघ, सहा.पो.निरीक्षक, पवन इंगळे, सपोनि पठाण, पोलीस अंमलदार नामदेव सिरसाठ, विठठल डोके, वाल्मिक निकम, गोपाल पाटील, शिवानंद बनगे, संतोष डोंगरे, अशोक वाघ, योगेश तरमाळे, जीवन घोलप, चालक कुडे यांनी केली आहे.