बार्टी कडून समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे संत रविदास महाराज यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
वसमत* :: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे हिंगोली जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यादव, गायकवाड सिद्धार्थ गोंवदे मार्गदर्शनाखाली समतादूत मिलिंद आळणे अध्यक्षस्थानी मधुकर कोरडे हे होते. प्रमुख पाहुणे महिद्र जाधव हे होते सर्वप्रथम संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली. संत रोहिदास महाराज, ज्यांना संत रविदास म्हणूनही ओळखले जाते, हे 14व्या-15व्या शतकातील एक महान संत, कवी आणि समाजसुधारक होते. त्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध उभे राहून समानतेची शिकवण दिली. संत रोहिदास महाराज यांचे साहित्य आणि भजन आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहेत, ज्यामध्ये त्यांनी प्रेम, न्याय, आणि मानवतावाद यांचे महत्त्व सांगितले आहे.
त्यांच्या शिकवणींचा प्रभाव शीख धर्माच्या आदि ग्रंथमध्येही दिसून येतो, जिथे त्यांची 41 भजने समाविष्ट आहेत.
संत रोहिदास महाराजांनी त्यांच्या साधेपणाने आणि दानशूर स्वभावाने अनेकांना प्रेरित केले. त्यांची शिकवण आजही मानवतावाद, समता आणि धार्मिक सौहार्दासाठी मार्गदर्शक मानली जाते.यावेळी कार्यसंतक्रमास रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करताना मधुकर कोरडे, महिंद्र जाधव ,राज कोल्हे, देविदास येगडे ,बालाजी देशमाने ,बाबुराव कोरडे ,हरिकिशन कोरडे, पिर्जी अन्नपूर्णे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते