कणकवली (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
वर्ग मित्र भेटले कीं, पहिले वर्गातील बेंच पार्टनर आठवतात. ती बेंच, केलेली मजा-मस्ती, मारामारी, खेळ या आठवणी जाग्या होतात. कणकवली येथील एस.एम.हायस्कूलच्या एस्.एस्.सी.१९७६ बॅचचे ३३ वर्षांनी २००९ मध्ये पहिले गेट-टुगेदर संपन्न झाले होते. अलिकडच्या काळात सतत चारपाच वर्षे गेट-टुगेदर होत आहे. मात्र यावर्षी एस.एम. हायस्कूलच्या एस.एस.सी. १९७६ चा तीन दिवसीय स्नेहमेळा नुकताच महाड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी विद्यार्थी-विद्यार्थिनीनी आपापल्या कार्यक्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपली. ४९ वर्षानंतरही शिक्षकांप्रेमी आदरयुक्त भीती संपादित केलेल्या ज्ञानाच्या आधारावर समाजात वावरताना ज्ञान प्रदान करणा-या त्या गुरुजनांना न विसरता ४९ वर्षानंतरही मोठे झाले, आजी-आजोबा झाले, तरीही प्रेम‐वासल्य शिक्षकांप्रती नतमस्तक होत आहेत. कणकवली येथील एस.एम. हायस्कूलच्या एस.एस.सी १९७६ च्या या बॅचचे हे माजी विद्यार्थी-विद्यार्थींनी अभिमानास्पद वाटणा-या गुरुजनांच्या आदर्शनुसार शेती, व्यवसाय, वैद्यकिय क्षेत्र, शैक्षणिक, बॅकींग क्षेत्र, सामाजिक, औद्योगिक क्षेत्र, सरकारी, खाजगी आस्थापनावरुन सेवा निवृत्त होऊन स्नेहमेळाचा आनंद घेत आहेत. प्रत्येकाच्या शालेय जीवनातील आठवणी अविस्मरणीय असतात. मित्रांसोबत मिळुनमिसळुन केलेला अभ्यास, शिक्षकांचे विद्यार्थ्यांवरील असलेले प्रेम आणि वचक, हायस्कूल मधील क्रिडा स्पर्धा, स्नेहसंमेलन, शिक्षकांनी दिलेली शिक्षा अशा विविध आठवणींना उजाळा मिळाला.कर्तव्य आणि कृतज्ञता ही भारतीय संस्कृतीतील महत्वपूर्ण मुल्ये आहेत. कृतज्ञतेची जाणीव असल्यामुळे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे सर्वांच्याच चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता.या तीन दिवसीय गेट-टुगेदर मध्ये महाड शहरातील दिवे आगार येथील श्री सुवर्ण गणेश मंदिर येथील मुर्तीचे दर्शन घेतले.त्यानंतर दिवे आगार बीच वर संध्याकाळी फेरफटका मारला.दुस-या दिवशी रायगड रोप वेची सफर केली.रायगड च्या पायथ्यापासून ते रायगड किल्ल्यावर रोप वेने जाण्यासाठी फक्त चार मिनेटे लागतात.रोपवेने गडावर जाण्याचा हा क्षण सर्वांनाच रोमहर्षक असाच होता. रायगड किल्यावर मेहडंबरी, शिवाजी महाराजांचे प्रत्येक दालन, बाजारपेठ, तटबंदी, टकमक टोक, हिरकणी बुरुज, धान्य कोठार, महादेव मंदीर, अशी रायगडावरील प्रत्येक ठीकाणांवरील माहिती येथील गाईड ने सविस्तर पणे दिली. येथील शिवकालीन रायगड किल्ल्याची गाईड माहिती सांगत असताना स्फुर्तीदायी रोमांच उभा रहात होता.सर्वांनीच रायगड रोप वेचा आनंद घेतला.त्यानंतर रात्रीच्या सत्रात ज्या माजी विद्यार्थी-विद्यार्थ्यींचा नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये वाढदिवस होते ते एकत्रितरित्या केक कापून वाढदिवस साजरा केला.त्यानंतर बालाजी हाॅलमध्ये संपन्न झालेल्या ४९ वर्षानंतर प्रथमच भेटलेले आमचे वर्गमित्र, सदाबहार हसमुख प्रसंन्न व्यक्तीमत्व सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डाॅ.संदिप कदम यांनी तर सर्वांनाच सुखद धक्का दिला, त्यांनी प्रास्ताविक तर केलेच,पण स्वतः सर्वांच्याच व्यक्तीमताची ओळख स्वतः डाॅ.संदिप कदम यांनी नवर्षाची (२०२५) प्रत्येकाच्या नावाची आकर्षक डायरी व २०२५ चे कॅलेंडर देऊन यथोचित सत्कार केला.यावेळी प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले.तसेस एस.एम.हायस्कूलच्या एस.सी.सी१९७६ च्या स्नेहमेळ्याचे उत्कृष्ट शिस्तबद्ध करणारे माजी विद्यार्थी महाडचे उद्योजक उन्मेश राजेशिर्के व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मधुरा राजेशिर्के यांनी स्वतःकडून “कुशावतीचा कोतवाल”हे डाॅ.कुमार सिंगल (भा.पो.से.) यांच्या घटनेवरिल पुस्तक सर्वांना भेट दिले.या स्नेहमेळ्यासाठी उन्मेश राजेशिर्के व सौ.मधुरा राजेशिर्के यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच यावेळी कणकवलीतील उद्योजक माजी विद्यार्थी प्रसाद देसाई यांनीही सर्वांना काजुगर भेट दिले.इतरही विद्यार्थ्यांनी गोडधोड खाऊ देऊन तोंड गोड केले.तसेच पालीच्या गणपतीचेही दर्शन घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.संदिप उत्कृष्टरित्या केले.आणि संजय पाध्ये,नंदु आळवे,प्रसाद देसाई यांनी सर्वांच्यावतीने आभार मानले. वृंदाचे चिरजिंव नवनीत प्रभुझांन्टे याने तीन दिवसीय स्नेहमेळ्याची उत्कृष्ट फोटोग्राफी केली. कणकवली येथील एस.एम. हायस्कूलच्या एस.एस.सी.१९७६ च्या बॅचच्या स्नेहमेळ्यासाठी उन्मेश राजेशिर्के, सौ.मधुरा राजेशिर्के, संजय पाध्ये, प्रसाद देसाई,नंदु आळवे यांनी विशेष मेहनत घेतली.