फुलंब्री :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद ता- फुलंब्री येथे क्रांतिबा ज्योतिबा फुले स्मृती दिना निमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी एका वैचारिक सभेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल वेळे मॅडम होत्या.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या जीवन-कार्यावर आपले विचार व्यक्त केले.इयत्ता चौथीच्या स्वराली,काजल व देवयानी या विद्यार्थिनींनी गीत सादर केले.शाळेतील सहशिक्षक सांडू शेळके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शाळेतील सहशिक्षक उज्वलकुमार म्हस्के यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या प्रसंगी मंगला पाटील,विलास चव्हाण,नितीन शेळके,स्वप्नील पाटील,रुपाली ताठे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.या सभेचे सूत्रसंचालन राधिका कापडे व प्रीती लहाने यांनी केले.या सभेचे आभार प्रदर्शन सहशिक्षिका संगीता वाढोनकर मॅडम यांनी केले.या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.