परभणी / प्रतिनिधी, शहरातील विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक संघटनांच्या समन्वयातून आम्ही सर्व भारतीय हा संकल्प घेऊन आज २९ नोव्हेंबर रोजी शनिवार बाजार येथून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत संवैधानिक मूल्यांचा जागर करत भव्य देखाव्यासह संविधान सन्मान मिरवणूक संपन्न झाली.
स्वामी विवेकानंद अकॅडमीचे प्रमुख प्रा विठ्ठल कांगणे यांच्या संकल्पनेतून आणि संविधान प्रेमी विविध संघटनांच्या समन्वयातून सकाळी शनिवार बाजार येथून या मिरवणूकिस प्रारंभ करण्यात आला. ट्रॅक्टरवर संविधान प्रतिकृती व पेन असा आकर्षक देखावा व हातात संविधान घेतलेली बाबासाहेबांच्या भूमिका प्राशिक घनसावंत या बाल विद्यार्थ्यांने सजीव देखाव्यातून साकारली होती.
विवीध जाती पंथ धर्म यांची एकता एका समान धाग्यात भारतीय संविधानाने गुंफली असल्याचे चित्र या देखाव्यातून सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
या संविधान सन्मान मिरवणुकीत प्रा विठ्ठल कांगणे, विजय वाकोडे, डॉ भारत नांदुरे,सुधीर साळवे, दीपक खंदारे,प्रमोद कुटे, सतीश भिसे, चंद्रप्रकाश लाटे,संजय मुळे, गौतम भालेराव, आशिष वाकोडे,राहूल घनसावंत, लखन जामकर, गौतम भराडे, सचिन पाचपुंजे,विश्वजीत वाघमारे, मिलिंद घुसळे, अतुल वैराट, जोंधळे, यांच्या सह विद्यार्थिनी व विद्यार्थी सहभागी झाले होते.
एका कामगाराच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थित जनसमुदायाला विजय लोकनेते विजय वाकोडे यांनी संबंधित केले.व शेवटी मनस्वी घनसावंत या बाल विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.