औरंगाबाद, संतोषीमाता नगर – श्रावस्ती बुद्ध विहार येथे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचन सत्राचा सांगता समारंभ शनिवार, दिनांक १६नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.तीन महिन्यांच्या या वाचन कालावधीत पूज्य आर्याजी अभिधम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी ग्रंथाचे वाचन करण्यात आले. या समारंभाला विशुद्धानंद बोधी, आर्या, आधीधम्मा,शांतीदूत थेरो,भन्ते सुगदबोधी,धम्मानंद दीपंकर थेरो, संघपाल थेरो भन्ते यशोदीप, भन्ते बुद्ध पाल,संबोधी आर्याजी आम्रपाली आर्याजी, धम्मनयना आर्याजी, अधिधम्मा आर्याजी
आणिभिक्खू संघ, भिक्खुनी संघाची उपस्थिती लाभली.
सकाळी ८ वाजता धम्म ध्वजारोहण करण्यात आले.
परीत्रान पाठ,भिक्खू संघाची रॅली, भिक्खू संघाचे भोजनदान, त्रिशरण पंचशील आणि भिक्खू संघाचे स्वागत
,भिक्खू संघाची धम्मदेशना
आणि सर्व श्रद्धावान उपासक, उपासिका आणि बाल बालिकांचे भोजनदान देण्यात आले.
हा समारंभ श्रावस्ती बुद्ध विहार, संतोषीमाता नगर, मुकुंदवाडी येथे संपन्न झाला.या पवित्र प्रसंगी सर्व उपासक-उपासिका, तसेच बुद्धांवर श्रद्धा असलेल्या अनुयायांनी सहपरिवार उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
आर्याजी अभिधम्मा,
आल्काताई बनकर,
प्रकाश भाऊ कोतकर, संकल्प संघर्ष विहार समिती व श्रावस्ती महिला मंडळानी परिश्रम घेतले.