ज्युनिअर चार्ली चाप्लिन समाजसेवक सुमित पंडित यांनी आपल्या मुख अभिनयातुन नागरिरांना मतदान १००% करण्यासाठी आणि नियमाचे पालन करण्यासाठी नागरिकांना केले आव्हान
आपल्या मूक अभिनयाने अवघ्या जगाला भुरळ घालणारे चार्ली चॅप्लीन यांची भुमिका जिवंत ठेवण्यासाठी ज्युनिअर चार्ली फाउंडेशन चे कलाकार समाजसेवक सुमित पंडित यांनी विधानसभा २०२४ सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का १००% वाढविण्यासाठी आणि मतदान दिवशी नियमाचे पालन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे ज्युनियर चार्ली सोमनाथ स्वभावणे आणि सुमित पंडित यांनी चंग बांधला आहे.आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोदबाजार पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल इंगळे साहेब यांनी मा.पोलीस अधीक्षक श्री विनयकुमार राठोड सर,अपर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार सर आणि मा.विष्णु भोये सर यांचे मार्गदर्शनाने वडोदबाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आळंद येथे व दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळ पर्यंत चार्लीच्या वेशभूषेतून मुख अभिनयातुन लोकसभा निवडणूकीत नागरिकांनी मतदान करण्याचे तसेच नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन केले.चार्लीची हुबेहुब व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या ज्युनिअर चार्ली ला वैजापुरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.काहीही करा,पन मतदान चुकवू नका,सुट्टी आहे म्हणून गावाला जाणवु नका.बाहेरगावि असणाऱ्यांनी पोस्टल द्वारे मतदान करा आणि मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका, मतदान बुथवर गोंधळ करू नका,मतदान झाल्यानंतर मतदान केंद्राच्या परिसरात थांबू नका,मतदान केंद्रावर वाहने आणू नका,मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात प्रचार करणेस मनाई आहे असे मुक अभिनय करून कायद्याचे पालन करा असे म्हणत हात जोडून विनंती करीत,या ज्युनिअर चार्ली फाऊंडेशनने राज्यभर ही मोहीम सुरू केली आहे. चार्ली फाउंडेशन च्या वतीने जनजागृती साठी,मतदान,पोलीओ,रस्ते वाहतूक सुरक्षा अथवा कुठलेही सर्वेक्षण,तो शासनाच्या खांद्याला खांदा लावून चार्लीच्या भूमिकेतून पटवून देण्याचे काम करतो.तसेच सुमित सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतो. या टीमने राज्यभरात ३१ ज्युनिअर चार्ली उभे केले आहेत. हे सर्वच चार्ली बॉलर टोपी, मिशा आणि छडी असलेल्या चार्ली चॅप्लिनच्या भूमिकेतून मतदानाचे आवाहन करत आहेत.वडोदबाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज या मतदान जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात पोलीस ठाणे,मुख्य बाजारपेठेचे गाव आळंद ठिकाणी चालींच्या भूमिकेतून सुमित पंडित यांनी नागरिकांना हसवत हात जोडून मतदान करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे आयोजन माननीय पोलीस अधीक्षक,मा.अप्पर पोलीस अधीक्षक तथा मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पो. नि सुनिल इगळे साहेब यांच्या प्रयत्नातून मतदान जनजागृती करण्यासाठी सहकार्य केले.हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी पो.उप.नी.झिजोर्डे साहसाहेब,पो.ह.निवृत्ती मदने,मुस्ताक पटेल,सिधार्त वक्ते,महिला अंमलदार संगीता भांबळ,व सागर शिंदे पंचक्रोशीतील नागरिक मतदार व कर्मचारी उपस्थित होते तसेच ज्युनिअर चार्ली समाजसेवक सुमित पंडित यांचे सर्वदुर कौतुक होत आहे.
नागरिकांनी मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी कायदाच्या नियमाचे पालन करणे बाबत उपस्थित नागरिकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल इंगळे यांनी केले आव्हान.
विधानसभा २०२४ सार्वत्रिक निवडणूक यामध्ये नागरिकांनी सतर्क राहून व नियमांचे पालन करून १००% मतदान करावे याकरिता आम्ही नागरीकांना आव्हान करीत आहोत
मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात व केंद्रावर मोबाईल तसेच व्हिडिओ चित्रीकरण करणारे साहित्य घेऊन जाऊ नये,मतदान केंद्रावर गोंधळ व गैरशिस्त वर्तन करू नये.,मतदान झाल्यानंतर मतदान केंद्राच्या परिसरातून निघून जावे नाहक मतदान केंद्राच्या परिसरात थांबू नये , मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात प्रचार करू नये तसेच वारंवार वाहन घेऊन येऊ नये, असे आव्हाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल इंगळे यांनी केले