एखादा लांडगा जर मेंढीला म्हणाला की,चल तुला स्वर्ग दाखवितो,ते कसे शक्य आहे ? (Congress,Shivshena,MNS, Rastrwadi Congress,Shinde sena, Bhartiy Janta Party हे लांडगे आहेत,ज्यांनी आत्ता पर्यंत भारतातील बहुजन समाजाला “स्वर्ग” दाखविण्याचे नाटक करत आहे.त्यामुळे आत्ता वेळ आली आहे की,या पुरोगामी महाराष्ट्रातील सर्वसामान्य “मतदारांनी” जात व धर्मअहंकार आणि गर्वाच्या पलीकडे जाऊन राजकीय पक्षाची निवड करणं आणि त्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला “मत” देऊन विजयी करणे काळाची गरज आहे.
या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये गतकाळातील अनेक विधानसभा निवडणुकीकडे आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की,इथं प्रत्येक निवडणुकीमध्ये जात फॅक्ट लक्षात घेऊनच जातीच्या नावावर निवडणुका लढविल्या जातात आणि जिंकल्या सुद्धा जातात,ही दाहक वास्तविकता कबूल करून विकासाच्या उन्नतीच्या आणि प्रगतीच्या दृष्टीने पावले टाकत पुढे पावले टाकत असताना,आज आपणास जाती,धर्म,गावकी,
पाटीलकी आणि उच्च नीच भेदभावाच्या पलीकडे जाऊन उमेदवाराची पसंती केली करण गरजेच आहे.अन्यथा या राज्या मध्ये महात्मा ज्योतिबा फुले,अहिल्याबाई होळकर छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करून पुरोगामी महाराष्ट्रातील बहुजन समाजाला न्याय हक्क आणि अधिकार मिळवून दिले ते गमावण्याची वेळ आपल्यावर नक्कीच येणार आहे.
भारतीय संविधानाच्या निर्माण कर्त्यांनी संघराज्य ही संकल्पना मांडून केंद्र सरकार आणि राज्य सरकारची निर्मिती केली.केंद्र सरकारच्या बेधुंद कारभाराला रोखण्यासाठीच राज्य सरकारे आहेत.हे आपण विसरता कामा नये. राज्य सरकारची भूमिका काय ?राज्य सरकारने कोणती धोरणे अवलंबावी आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या असेम्ब्ली मध्ये जाऊन बसणारी आमदार मंडळी यांनी कोणत्या मुद्द्यावर विधानसभा निवडणूक लढवावी आणि जनतेला कोणती आश्वासन द्यावी,त्याच बरोबर राज्याच्या असेम्ब्ली मध्ये जनतेचे कोणते प्रश्न मांडले पाहिजे,हे आता मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. तरच आपण आपल्या तरुण पिढीच्या शिक्षण नोकरी आरोग्य उद्योग आणि व्यवसायाचे संरक्षण करू शकतो हे आपण नीटपणे समजले तर बरे होईल.
कारण आपण सर्व लोक प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वसामान्यपणे विचार करतो.परंतु राज्य असो किंवा देश असो आजही “विचारसरणीचाच” लढा मजबूतपणे लढण्यात येत आहे.हे आपण कधीच लक्षात घेत नाहीत.आज ही धर्मकारण,कट्टरतावाद,भाषावाद याला प्राधान्य देऊन राजकारण करण्याचे या मनुवादी आणि गांधीवादी राजकीय पक्षांचे उद्देश का आहेत ? हे आपण लक्षात घेत नाहीत.प्रस्थापित मनुवादी आणि गांधीवादी राजकीय पक्षांची त्यांच्या नेत्यांची,आमदारांची आणि खासदारांची,तसेच त्या त्या राजकीय पक्षाचे ध्येय आणि धोरणाची व उद्दिष्टांची आपण जर गंभीरपणे पाहणी आणि चिकित्सा केली तर आपल्या लक्षात येईल की, एखाद्या शेळीला स्वर्ग दाखवतो म्हणणाऱ्या लांडग्याप्रमाणेच यांच्या या पक्षांची मानसिकता आहे.हे आपल्या लक्षात येईल.त्यामुळेच आपल्या अर्थात धाराशिव ह्या एका लोकसभेवरून आपण उदाहरण घेऊ शकता.आपल्या लोकसभेतील आमदार आणि खासदार ही मंडळी गल्लीबोळातील चौकाला नावे देण्यात,नाल्या आणि गटाराचे आश्वासन देण्यात,पुतळ्याच्या, स्मारकाच्या घोषणा करण्यात, स्वतःला धन्यता मानतात आणि आपण ही मूर्खासारखे त्यांच्या या पोकळ घोषणांना बळी पडून आणि तर कधी स्वतःच्या जातीगोतीचा आणि सवर्णतेचा मुद्दा पुढे करून मनुवादी आणि गांधीवादी राजकीय पक्षांच्या आमदारांना,खासदारांना आपण निवडून देत असतो.हा एक प्रकारे “आत्मघातच” आहे.हे आपल्या लक्षात येत नाही.
महाराष्ट्राच्या निर्मितीपासून ते आज पर्यंत जेवढ्या काही विधानसभा निवडणुका झाल्या,या सर्व प्रकारच्या विधानसभा निवडणुका मध्ये पैसा प्रॉपर्टी,खून आणि धमक्या याचा सर्रास वापर करून निवडणुका जिंकण्यात आल्या.त्यामुळे आपल्या उस्मानाबाद सारख्या मागास आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये म्हणावी तितकी प्रगती झाली नाही.हे आपण कधीच कबूल करत नाहीत.गावकी आणि भाऊकीच्या वादामध्ये सबंध तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास खुंटित करणे हे कुठलं शहाणपण आहे ? आज विधानसभा निवडणुका चालू आहेत.त्यामुळे आपण अतिशय चिकित्सक पद्धतीने विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा येणारी पिढी आपल्याला “गांडू” म्हणल्याशिवाय राहणार नाही.हे उस्मानाबादच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेतल्या “मतदारांनी” लक्षात घ्यायला पाहिजे.
आता ही (2024) होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्याने मनुवादी,गांधीवादी आणि फुले,शाहू,आंबेडकरवादी विचारसरणीचे राजकीय पक्ष निवडणूक मैदानामध्ये उतरलेले आहेत.या तीनही प्रमुख विचारसरणीच्या लढाईमध्ये मानवतावाद आणि समतेची जोपासणारा करणारा फुले,शाहू, आंबेडकरवाद महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपले उमेदवार मैदानात घेऊन उतरला आहे.त्यापैकीच वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील अनेक विधानसभा जागा लढवीत आहे. उस्मानाबाद विधानसभेमध्ये सुद्धा तीन जागा वंचित बहुजन आघाडी लढविता आहे.वास्तविक पाहता वंचित बहुजन आघाडी ही आरक्षणाचा समर्थन करणारी आणि संविधानवादी राजकीय पार्टी असून या राजकीय पक्षाला मोठा जनाधार सुद्धा आहे.गरज आहे ती फक्त आपण योग्य पर्याय निवडण्याची आणि गाव,शहरातील,वाड्या,वस्ती व तंड्यावर जाऊन मनुवाद आणि गांधीवाद्याकडून शोशित आणि पीडित असलेल्या मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याची आणि या कामी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्राण पणाला लावून काम करणं गरजेचं आहे.अन्यथा बेरजेच्या राजकारणामध्ये वजाबाकी होतच असते आणि त्या ही ऊपर म्हणजे कार्यकर्त्यांच्या चुकीच्या कामाच्या पद्धतीमुळे आपल्या संघटनेला नावे ठेवून घ्यावी लागतात.हे वास्तविक ज्ञान कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
उदाहरणार्थ धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील आमदारांचा मागच्या पाच वर्षाचा विधानसभेतील आलेख जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की,आमदारांनी मग ते कैलास पाटील असतीलं,ज्ञानराज चौगुले असतील,राणा पाटील असतील किंवा तानाजी सावंत असतील या धुरंधर नेत्यांनी आमदारांनी त्या त्या विधानसभेतील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आरोग्य,शिक्षण,नोकरी,उद्योग व्यवसाय यासह शेतकरी शेतमजुरांच्या समस्या,महिला सुरक्षा,मुलींचा संरक्षण या सर्वच महत्त्वपूर्ण विषयाच्या बाबतीत कितीदा असेंब्लीत प्रश्न मांडले आहेत.याची जरा चौकशी करून पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल की,ही सर्व नेते मंडळी फायद्यासाठी त्यातून व्यवस्थित चातुरवर्ण व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी जातीवादाला मजबूत करण्यासाठीच काम करतात अशीही “रानबोके” आणि “लांडगे” मंडळी महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे “रक्तच” पीत आहेत.हे आपल्या लक्षात येईल.
तर दुसऱ्या बाजूला मनुवादी आणि गांधीवादी विचारसरणीचे राजकीय पक्ष साम,दाम,दंड,भेद आणि जातीचा उच्च अभिमान सोबत घेऊन निवडणूक मैदानात उतरलेली आहेत.वास्तविक पाहता मनुवादी आणि गांधीवादी विचारसरणीची काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना, शिंदे सेना,भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व राजकीय पक्षांचे चालक आणि मालक हे सवर्ण अर्थात विषमता वादाला सांभाळणारी, भांडवलशाहीला जोपासणारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संविधानाला आणि आरक्षणाला विरोध करणारी नेते मंडळी आहे. त्यामुळे या लांडग्यांनी वरवरून यांनी किती ही आपल्याला “आरक्षणाचे” गाजर दाखविले,आरक्षण देऊ म्हणाले तरी सुद्धा यांचा मूळ भाव हा आरक्षणाला विरोध करण्याचा आहे. त्यामुळे या सवर्ण लांडग्यांनी बहुजन रुपी शेळीला स्वर्ग दाखवितो म्हणणे म्हणजे खूप मोठी फसवणूक आणि बहुजन मतदारांचा खून करण्याचेच षडयंत्र आहे.जसे उपरोक्त म्हणतील लांडगा हा शेळीला स्वर्ग दाखवतो म्हणून इच्छित स्थळी घेऊन जाऊन तिचा “खून” करतो,तिचे “रक्त” पितो, त्याच प्रमाणे मनुवादी आणि गांधीवादी राजकीय पक्षाची मंडळी या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला “स्वर्ग” दाखवण्याची भाषा करतील,परंतु पुन्हा संपूर्ण पाच वर्षे आपला “खुनच” करणार आहेत आणि आपलं “रक्तच” पिणार आहेत.हे काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना,मनसे,भारतीय जनता पार्टी शिंदेसेना इत्यादी मनुवादी व गांधीवादी राजकीय पक्षांचे षडयंत्र बहुजन समाजातील प्रत्येक जाती धर्माच्या “मतदारांनी” लक्षात ठेवलं पाहिजे !
लेखक,विजय अशोक बनसोडे
जि.सं.उपाध्यक्ष 8600210090
भारतीय बौद्ध महासभा,धाराशिव (द)
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️