चत्रपती संभाजीनगर, दि. 21 मार्च – बिडबायपास मेन रोडवरील गुरूलॉस येथे आज दुपारी 12:38 वाजता एअर कंडिशनरला (A.C.) आग लागल्याची घटना घडली. श्री. प्रदीप यांनी तातडीने अग्निशमन विभागाला फोन करून माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पदमपूरा फायर स्टेशनमधून अग्निशमन दलाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपत भगत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले. या वेगवान कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली आणि परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण होण्यापासून रोखले गेले.
अग्निशमन पथक:
उप अग्निशमन अधिकारी: विजय राठोड, अशोक खांडेकर
ड्युटी इंचार्ज: हरिभाऊ घूगे
अग्निशामक जवान: दिपक गाडेकर, प्रसाद शिदे, अजिंक्य भगत, उमेश भोसले, चेतन घाडघे, नंदू घूगे (पदमपूरा फायर स्टेशन)
या सर्वांनी आपल्या तत्परतेने आणि कर्तव्यनिष्ठेने आग आटोक्यात आणली. स्थानिक नागरिकांनीही अग्निशमन दलाच्या या धाडसी कार्याची प्रशंसा केली.