छत्रपती संभाजी नगर,
मौजे लाखनी, गावातील सर्वधर्मीय उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक सलोख्यात साजरी करण्यात आली. याप्रसंगी गावातील व परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमासाठी उंदरवाडी येथील सरपंच विनोद कदम, हरी तात्या कदम, बाळासाहेब गडकर, राहेगाव येथील सरपंच अशोक म्हस्के, लाखनीचे सरपंच रामभाऊ चौधरी, माजी सरपंच नानासाहेब कदम, तुळशीराम पाटील अकोलकर, उपसरपंच रमेश कदम, शेख साबीर भाई, शालेय समितीचे अध्यक्ष रामदास कदम, नियोजन समितीचे अध्यक्ष कैलास कदम, उपाध्यक्ष मनोज त्रिभुवन यांची विशेष उपस्थिती होती.
तसेच समितीचे सदस्य गणेश कदम, जनार्दन कदम, प्रभाकर कदम, बाबासाहेब चौधरी, चंदन दादा अकोलकर, कैलास विश्वनाथ कदम, गणेश माधव कदम, संतोष लंबे, सुनील तात्या लंबे, आबाराव नाना कदम, किशोर वाल्मीक कदम, किशोर रामजी कदम, आकाश त्रिभुवन, प्रदीप त्रिभुवन, मिलिंद त्रिभुवन आदी गावकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्वधर्मीय उत्सव समितीने योग्य नियोजन करून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना वक्त्यांनी सामाजिक न्याय, बंधुता आणि समतेचा संदेश देणाऱ्या त्यांच्या विचारांची महती सांगितली. उपस्थितांनी ‘जय भीम’ च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.कार्यक्रमाची सांगता सामूहिक प्रार्थना व जलपानाने झाली.