छत्रपती संभाजीनगर (निळे प्रतिक न्यूज नेटवर्क) :कौटुंबिक न्यायालयातील खटला मागे घेण्यासाठी बोलावून पतीनेच पत्नीला शीतपेयात विष मिसळून देण्याचा प्रकार नारेगाव येथे १८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडला. सिडको एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेख मोईन शेख चाँद (४०, रा. अंबड, जि. जालना), रईस बेग अमीन बेग (३०) आणि नाजेरा (३२) अशी आरोपींची नावे असून, पीडित महिला शाहिस्ता मोईन शेख (३२, रा. अजीज कॉलनी, नारेगाव) यांच्याशी शेख मोईनचा विवाह झाला होता. मात्र, दोघांमध्ये सतत वाद असल्याने ते विभक्त राहात होते
१८ फेब्रुवारी रोजी आरोपींनी शाहिस्ताला भारत काटा येथे बोलावले व तिला खटला मागे घेण्यास सांगितले. यावेळी, सोडचिठ्ठी देण्याचे आमिष दाखवत त्यांनी तिला विष मिसळलेले कोल्ड्रिंक दिले. शीतपेय प्यायल्यानंतर तिला चक्कर आली आणि आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. मुंडे करत आहेत.