रविराजे उपाध्ये”
काही-काही मूलं सिगरेटी ओढतात किंवा दारू पार्ट्या करतात! जे काम मुलं करू शकतात तर आम्ही मुलींनी केले तर काय बिघडले? का करू नये? तुम्ही जसे करता तसे पानटपर्र्यां वर आम्हीही सिगारेटी फुंकू! आम्हीही बीअर बार मध्ये बसून बीअर रिचवू!” असे म्हणून काही उच्चभ्रू मुली या मुलांचे अनुकरण करू लागल्या! यालाच त्या स्त्री-पुरुष समानता समजू लागल्या. ‘ते करतात तर मीही का करू नये?’ इतक्या सरधोपटपणे त्या वागू लागल्या. काय चूक, काय बरोबर, याचे त्यांना सोयरसुतक उरले नाही! खरे तर, असेच सगळे वागू लागले तर समाजात बजबजपुरी माजेल, हा धोका आहे.
हे लिहायचे कारण म्हणजे आज असेच भरकटलेले उदाहरण पाहायला मिळाले. ‘लग्न ठरविण्यात अडसर ठरणारी अवास्तव अपेक्षा’ ही एक नवीनच समस्या पुढे आली आहे, हे सत्य वास्तव आहे. एका Biodata मधील मुलाचे वर्णन असे:- जन्म 1995, शिक्षण 12 वी पर्यंत, मुलगा शेतकरी आणि त्याची लिखित स्वरुपातील अपेक्षा: *सरकारी किंवा प्राव्हेट जॉब पाहीजे. शेती 15, 20 एकर असेल तर उत्तम! या सर्व (गोष्टी) मुलीजवळ असेल, तेव्हाच संपर्क करा.
अपेक्षा ठेवण्यावर कुणाचे बंधन किंवा नियंत्रण असणे शक्यच नाही आणि ते बरेही नाही. अपेक्षा व्यवहार्य असाव्यात, एवढे मात्र आपण म्हणू शकतो. मुलाने या अपेक्षा लिहिल्या, त्यामागचे कथानक विचित्र आहे, असे म्हणावे लागेल. त्याला त्याच्या एवढीच म्हणजे बारावी शिकलेली एक मुलगी पसंत पडली. तिचे वडील शेतकरी आहेत. मुलीच्या वडिलांकडे मुलाने मुलीसाठी मागणी घातली तर तिचे वडिल म्हणाले, सरकारी नोकरीवाला पाहिजे! त्याला रिजेक्ट करण्यात आले. या घटनेचा मुलाच्या मनावर परिणाम झाला. जर शेतकरी बापाच्या बारावी शिकलेल्या मुलीला नोकरीवाला नवरा पाहिजे तर मग मला सुद्धा अशीच अट घालायला हरकत नाही.मुलाने असा हट्ट धरला. शेवटी त्याचे परिणाम काय होणार? काय आणि कुठे फरक पडणार? त्याच्या अशा हट्टाने मुलीकडील मंडळी आपल्या अटी बदलतील काय? उलट, मुलाने आपल्या अटीवर दृढ राहिल्यास मुलाचे लग्न होणेच मुश्किल होईल आणि त्याला जीवनभर कुंवारा रहावे लागेल, अशी शक्यताच जास्त आहे. विवाहपूर्व समुपदेशनाची आज किती गरज आहे, हेही या उदाहरणातून स्पष्ट होते.चुकीच्या विचारांमधून जे चुकीचे वर्तन करतात त्यांचे परिवर्तन कसे होईल, हा आंबेडकरवादी मार्ग आहे. परंतु दुसरीकडे “ते चूक करतात तर मग तीच चुक मीही का करू नये?” असा कुतर्क करणारी प्रवृत्ती जर बळावली तर मूळ समस्या (जी आपण कमी/ नष्ट करू पाहतो ती) अधिक वाढेल, यात शंका नाही. समस्यांचे निदान शास्त्रीय असेल, तरच ते समर्थनीय ठरावे. प्रतिशोध/ प्रतिस्पर्धा, सूड हा मार्ग अयोग्य आणि घातक मार्ग आहे.✍️ रविराजे उपाध्ये9300443317