छत्रपती संभाजीनगर : डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी जनक्रांती संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने संस्थापक अध्यक्ष प्रदीप त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण ठाकरे यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले.
डॉ. हेडगेवार रुग्णालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे चालवले जाते. या संस्थेचा लौकिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामुळे आणि रूग्णसेवेमुळे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या संस्थेच्या आवारात बाबासाहेबांचा पुतळा उभारणे आवश्यक असल्याची भावना रूग्ण, नातेवाईक, आंबेडकरी अनुयायी आणि जनक्रांती संघटनेने व्यक्त केली आहे.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपदादा त्रिभुवन, कामगार नेते गजानन खंदारे, युवा जिल्हाध्यक्ष मुन्ना मावस्कर, पश्चिम शहराध्यक्ष संदीप बुवा, मधुकर लांडगे, सुबोध घोडके, संजय ढोले, पांडुरंग लांडगे, दादाराव कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
— दैनिक ____________