निळे प्रतिक न्यूज नेटवर्क
वैजापूर | प्रतिनिधी
बौद्ध धर्मीयांचे सर्वोच्च पवित्र स्थळ असलेल्या बौद्ध गया (बिहार) येथील महाबोधी विहाराच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आणि सहकार्य करण्याच्या उद्देशाने वैजापूर येथे एका नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात यावे. महाबोधी विहारात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी बौद्ध भिक्खू आणि अनुयायी रात्रंदिवस उपवास, तपश्चर्या, आणि पोलिसांच्या व राजकीय व्यवस्थेच्या त्रासाला सामोरे जात संघर्ष करीत आहेत. त्यांना अधिक व्यापक पाठिंबा मिळावा, तसेच आपल्या गावातून किंवा तालुक्यातून त्यांना मदत कशी करता येईल, यावर विचारविनिमय करण्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, जिल्हा सचिव हरिभाऊ पठारे यांनी मत व्यक्त केले आहे.
या बैठकीत तालुकास्तरीय नियोजन, मदतीच्या स्वरूपाची रूपरेषा, आणि आंदोलनाला बळकटी देण्यासाठी आवश्यक पावले यावर चर्चा व्हावी . बौद्ध भिक्खूंनी सहन केलेल्या अन्यायाविरुद्ध सर्व बौद्ध बांधवांनी संघटित होऊन न्यायासाठी आवाज उठवावा, असे आवाहन पठारे यांनी केले आहे.