छत्रपती संभाजीनगर_ जागतिक महिला दिनानिमित्त महादेव मंदिर, एन-१२ येथे कांचन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. अर्चना वरें, पत्रकार ससो खंडाळकर, धनराज गोंडाने, किशोर गडकर, भावेश भिंगारे, अॅड. पुष्पा घोडके आणि संस्थेचे अध्यक्ष कांचन सदाशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, एकूण ५० जणांनी नेत्रतपासणी करून घेतली. या शिबिरादरम्यान नेत्रशल्यचिकित्सा तज्ज्ञ डॉ. अर्चनावरे पाटील, डॉ. अनुपमा कोकाटे, डॉ. वर्षा राठोड, डॉ. शिल्पा देशमुख, डॉ. दर्शना मंत्री, डॉ. निलेश मंडले, डॉ. गायत्री देशमानकर आणि सुशील कळंबे यांनी नेत्ररोग, दृष्टीदोष व आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन केले. संस्थेच्या या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळाली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.