छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी ) दि.२६ समाजातील सर्व कर्तृत्ववान बांधवांना सूचित करण्यात येते की, दरवर्षी आपण छत्रपती संभाजीनगर येथील “निळे प्रतिक” या नामांकित सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘समाजभूषण’ पुरस्कार देत असतो. परंतु यावर्षीपासून आम्ही साहित्यिक, सामाजिक, पत्रकारिता, कला व क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना साहित्यरत्न, साहित्यभूषण, समाजरत्न, कलारत्न, रंगकर्मी, कलाभूषण, क्रीडारत्न, क्रीडाभूषण, विद्रोही साहित्यिक नामदेव ढसाळ पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार, ‘दीनबंधू’ पत्रकारिता पुरस्कार, ‘दीनमित्र’ पत्रकारिता पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड पुरस्कार,व दरवर्षी दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार असे विविध पुरस्कार आम्ही देणार आहोत.
वरील पुरस्कारासाठी साहित्यिक, सामाजिक, पत्रकारिता कला, रंगभूमी, क्रीडा यापैकी कोणत्याही क्षेत्रात आपण केलेल्या कामगिरीबाबत आपली सविस्तर माहिती येत्या ५ जूनपर्यंत आमच्याकडे पाठवावी. सोबत सविस्तर पत्ता, फोन नंबर, व पासपोर्ट फोटो टाकण्यास विसरू नये. पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पहार असे राहील.
२० जून रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या ‘निळे प्रतिक’च्या वर्धापनदिन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
निवड समितीद्वारे आपली निवड होताच १० जून पर्यंत आपल्याला फोनद्वारे किंवा सोशलमिडियाद्वारे कळविण्यात येईल.निवड समितीचा निर्णय अंतिम राहिल.
आमचा पत्ता-
संपादक – रतनकुमार साळवे
दैनिक,’निळे प्रतिक”
निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी,संस्था,
छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद
फोन-9923502320