छत्रपती संभाजीनगर : आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अॅड. बी. एच. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत दलित अत्याचार विरोधी संघर्ष कृती समितीच्या महासचिवपदी सामाजिक कार्यकर्ते किशोर म्हस्के यांची निवड करण्यात आली. या बैठकीला लालनिशाण पक्षाचे ‘महासचिव भीमराव बनसोड आणि साथी सुभाष लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. समितीचे अध्यक्ष अॅड. मनोहर टाकसाळ व महासचिव बुद्धप्रिय कबीर यांचे निधन झाल्यामुळे अध्यक्ष आणि महासचिव ही पदे रिक्त होती. महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे या समितीचे पुनर्गठण करण्यात आले. सर्वप्रथम महासचिवाची निवड करण्यात आली. पुढील बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर सदस्यांची निवड केली जाणार असल्याचे अॅड. अभय टाकसाळ यांनी सांगितले.