Nile pratik news network
परभणी (प्रतिनिधी) त्रिविध पावन बुद्ध पौर्णिमा निमीत्ताने भव्य आकर्षक देखव्यासह निघालेल्या बुध्द संदेश मिरवणुकीत त्रिशरण पंचशीलेचा उदघोष कऱण्यात आला. हि मिरवणुक शहर वासियांत लक्षवेधी ठरली. शनिवार बाजार येथुन सायंकाळी डॉ सिध्दार्थ हत्तीअंबिरे, लोकनेते विजय वाकोडे, मिलिंद सावंत, विशाल जाधव, सुनिताताई साळवे ,ज्योती बगाटे, सुरेश मस्के, किरण मानवतकर शाम मोरे, बारकुजी मोरे, राजेश रणखांबे, राजेश गायकवाड , पवनकुमार शिंदे, डि आर तूपसुंदर आदींची उपस्थितीत प्रारंभ कऱण्यात आला. नालंदा धम्म विद्यालय व पंचशील नगर येथील विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीचा संदेश दिला. अत्यंत शिस्तबद्ध निघालेल्या मिरवणुकीत महिला मंडळे व उपासक उपासीका आणि सम्यक समृद्ध बहुउद्देशीय प्रतिष्ठान चे पदाधिकारी आणि धम्म मैत्री संवाद अभियानाचे मार्गदर्शक व घटक सहभाही झाले होते. त्रिविध पावन बुध्द पौर्णिमा निमित्त या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी संजय बगाटे, कचरूदादा गोडबोले, एम एम बरे, इंजि.आकाश हिल्लारे,गौतम भराडे, भुषण मोरे,सुदाम तूपसुंदरे उमेश शेळके, लखन सौंदरमल, संजीव अढागळे, समीर रोडे, आनंद सारणीकर संदीप गायकवाड रवी खंदारे,प्रिन्स गोडबोले यांनी परिश्रम घेतले,