छत्रपती संभाजी नगर /प्रतिनिधी दि.२३ ऑल इंडिया समता सैनिक दल डिव्हिजन, औरंगाबाद च्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्धाची २५६८वी जयंती मौजे धावडा ता. सिल्लोड जिल्हा औरंगाबाद व सेलगाव (राऊत ) ता.सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या दोन्ही गावी समता सैनिक दलाचे सैनिक खेड्यात जाऊन तथागत भगवान गौतम बुद्धाची २५६८ वी जयंती या गावांमध्ये जाऊन उत्साहात साजरी केली. यासाठी दोन कंपन्याचे नियोजन करण्यात आले होते.
मौजे धावडा ता. सिल्लोड येथील नेतृत्व हवालदार शंकर म्हस्के साहेब यांनी केले. तर सेलगाव (राऊत) येथील नेतृत्व हवालदार भारत काकडे साहेब यांनी केले.
यासाठी दलाचे अध्यक्ष कारभारी त्रिभुवन सर व सचिव प्रवीण कुमार साळवे यांनी मिटिंग मध्ये मार्गदर्शन करुन नियोजन केले.हवालदार शंकर म्हस्के साहेब यांच्या कंपनीत सचिव प्रवीण कुमार साळवे,नाथाजी वीर, गौतम नरवडे, महिला कमांडर मंगलताई बोर्डे, महिला उप आध्यक्षा शोभाताई अशोक जगताप, शशिकलाताई शंकर म्हस्के, संगीताताई बाळू अमराव, हिराबाई खरात, वाहूलबाई, व स्थनिक महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तर हवालदार भारत काकडे साहेब यांच्या कंपनीत हवालदार दिलीप गंगावणे साहेब, हावालदार रत्तन साळवे साहेब, अध्यक्ष कारभारी त्रिभुवन सर, परमेश्वर भालेराव, मास्टर जयेश प्रदीप त्रिभुवन, मास्टर सम्यक विजय देहरे, महिला प्रतिनिधी कमलबाई त्रिभुवन, अंजलीताई भारत काकडे,अलका अनिल मगरे,श्यालिनी विजय नरवडे, छायाबाई देहरे,कु. जिगीषi किशोर त्रिभुवन, कु. सांची प्रदीप त्रिभुवन,पियुषा किशोर त्रिभुवन व गावातील स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. या मंगळप्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्धांच्यi मूर्तिची प्रतिस्थापना सर्व सैनिकांच्या हस्ते करून ऑल इंडिया समता सैनिकांच्या वतीने अभिवादन करून खाडी मानवनंदना देण्यात आली.
यावेळी खीरदान व भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती.स्थनिक नागरिकांनी यासाठी खूप मेहनत घेतली.