Nile pratik news network
छत्रपती संभाजी नगर( प्रतिनिधी ) दि २४
औरंगाबाद जिल्हा (पश्चिम) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना दिलेल्या निवेदनात
खरिपाच्या लागवडीसाठी बियाणे खते कीटकनाशके आदी वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या साधनांचा वापर करत असताना बी बियाणांचा बोगसपणे म्हणजेच कालबाह्य झालेले किंवा निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री केले जातात ज्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. बोगस बियाणांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला म्हणजेच मालाला हमीभाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठे आर्थिक संकट निर्माण होते. या सर्व गोष्टींवर प्रशासनाचे काटेकोर नियंत्रण असले पाहिजे बोगस बियाणांची विक्री बंद झाली पाहिजे. शेतकऱ्यांना बियाणे अल्प दरात उपलब्ध करून दिली पाहिजे. बोगस बियाणे विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही केली पाहिजे. तालुकास्तरावर बोगस बियाणी विक्री करांबर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमली गेली पाहिजे. यदाकदाचित जिल्ह्यात बोगस बियाणे उपलब्ध झाले किंवा त्याची विक्री झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले तर आपल्या कार्यालयास ताळे ठोकू हा वंचित बहुजन आघाडी तर्फे आपल्याला गंभीर इशारा देण्यात येतो. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष योगेश गुलाबराव बन, महासचिव , मिलिंद बोर्डे,मंगेश निकम,उपाध्यक्ष पि के दाभाडे, संघटक सुभाष कांबळे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई सोशल मीडिया प्रमुख प्रवीण जाधव, संपर्कप्रमुख गणेश खोतकर, सदस्य रवी रत्नपारखे सईदअहमद काजी,आदी पदाधिकारीकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.