लेखक, भास्कर भोजने.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला राज्यघटने मध्ये लेखन स्वातंत्र्य,विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे त्यामुळे प्रत्येक जण आपलं मतं नोंदवू शकतो. विचार प्रकट करु शकतो तशीच प्रत्येक विषयांवर टिका टिप्पणी सुद्धा करु शकतो.हा त्याचा अधिकार आहे...!!
मात्र मतं नोंदवण्याच्या सबबीखाली, किंवा विश्लेषण,समीक्षण करण्याच्या सबबीखाली एखाद्या नेत्याच्या प्रतिमेवर, कार्यशैली वर आणि नेतृत्व गुणांवर चुकीच्या पद्धतीने, द्वेष भावनेने आणि अगदी विपरीत अर्थाच्या शब्दांचे योजन करुन प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या व्यक्तीला द्वेषाने पछाडलेला किंवा विकृत बुद्धीचा व्यक्ती असेच म्हणावे लागेल...!!
संपादक नसलेला परंतु संपादक असल्याची बतावणी करणारा स्वयंघोषित संपादक सुनील खोब्रागडे हा त्या अर्थाने व्यक्ती द्वेषाने पछाडलेला, विकृत बुद्धीचा व्यक्ती आहे...!!
वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यशैली वर व्यक्त होतांना सुनील खोब्रागडे असे म्हणतो की, प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण कायम धरसोडीचे, कोणतीही भरीव किंवा मजबूत चळवळ ऊभी न राहू देण्याचे, एक प्रकारे त्यांचा कल निर्माणात्मक सोल्युशन देणारे राजकारण न करता आहे ते विस्कटून टाकण्याचे, विध्वंसक राजकारण करण्याचे आहे असे दिसते….!!
" कायम धरसोडीचे राजकारण" याचा अर्थ कुठल्याही विचारधारेवर ठाम न राहता, विचारधारेला फाट्यावर मारुन आपल्या सोईचे, संधीसाधू वृत्तीचे, स्वस्वार्थाचे किंवा घराणेशाही चे राजकारण करणे असा होतो. एड. बाळासाहेब आंबेडकर हे गेली ४३-४४ वर्षे राजकारण करीत आहेत. त्यांनी स्वार्थी, सत्तालोलूप किंवा विचारधारेला हरताळ फासतं फुले आंबेडकरी विचारधारेच्या विपरीत मुल्यांचे राजकारण केल्याचा एकही पुरावा न देता.एकदा सत्तालोलूप तर दुसऱ्या वेळेस मूल्याधिष्ठित असे धरसोड वृत्तीचे राजकारण केल्याचा एकही पुरावा न मांडता. प्रयोगशीलता न समजून घेता.कायम धरसोडीचे राजकारण असा चुकीचा आणि बदनामी करणारा शब्दप्रयोग करुन सुनील खोब्रागडे आंबेडकरी समुहाचा बुद्धीभेद करण्यासाठी बेछूट आरोप करतोय म्हणून तो विकृत बुद्धीचा आहे...!!
द्वेषाने पछाडलेल्या विकृत बुद्धीच्या स्वयंघोषित संपादकाला राजकीय समिक्षा करता आली नाही,त्याने आंबेडकरी समुहाचा बुद्धीभेद करण्याच्या दृष्ट हेतूने विपर्यस्त मांडणी केली. अर्थाचा अनर्थ केला. मतिमंद स्वयंघोषित संपादकाला सांगितले पाहिजे की, प्रस्थापितांनी आंबेडकरी राजकीय चळवळीत निर्माण केलेली राजकीय लाचारी घालवून स्वाभिमानी राजकीय चळवळ उभी करणे म्हणजे भरीव, निर्माणात्मक, सोल्युशन देणारी राजकीय चळवळ उभी करणे होय. आणि गेल्या ४० वर्षांत प्रकाश आंबेडकर यांनी ते सिद्ध करुन दाखविले आहे...!!
” सुनील खोब्रागडे म्हणतो प्रकाश आंबेडकरांचा कोणतीही भरीव किंवा मजबूत चळवळ उभी राहू न देण्याचे, आहे ते विस्कटून टाकणारे विध्वंसक राजकारण करण्यावर भर आहे असे दिसते…!!
सुनील खोब्रागडे यांच्या या मांडणीतून एड. बाळासाहेब आंबेडकर हे विध्वंसक राजकारण करतात असा अर्थ ध्वनीत होतो…!!
विध्वंसक ही संज्ञा वापरतांना एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय प्रवेशा अगोदर काहीतरी चांगले निर्माणाधीन, सृजनात्मक, सत्ताधारी अस्तित्वात होते आणि त्या चांगल्या,भरीव आणि सृजनात्मक राजकारणाचा प्रकाश आंबेडकर यांनी विध्वंस केला आहे या अर्थाने वरील वाक्य येते....!!
आंबेडकरी विचारधारेच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय प्रवेशापूर्वी चळवळ मजबूत, भरीव, सत्ताधारी ,निर्माणात्मक सोल्युशन देणारी असण्याचा एक तरी पुरावा सुनील खोब्रागडे यांनी द्यायला पाहिजे होता.आणि प्रकाश आंबेडकरांच्या धोरणामुळे,राजकीय प्रयोगामुळे अगोदर अस्तित्वात होते त्याचा विध्वंस झाला हे दाखवून मग प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण विध्वंसक आहे हे मांडायला पाहिजे होते. तसे न करता ते केवळ बेछूट आणि शब्दबंबाळ आरोप करीत सुटले आहेत म्हणून ते व्यक्ती द्वेषाने पछाडलेले विकृत बुद्धीचे आहेत हेच सिद्ध होते...!!
सुनील खोब्रागडे दुसरा आरोप करतांना एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या २०-२५ जुन्या सहका-यांच्या नावांची यादी मांडून असे म्हणतात की, यापैकी एकालाही प्रकाश आंबेडकर यांनी मोठे होऊ दिले नाही...!!
खरं म्हणजे भारिप, बहूजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष उपेक्षित, विस्थापित वर्गाच्या सत्तेचं राजकारण करणारा राजकीय पक्ष आहे म्हणून इथं राजकारणाच्या सुरुवातीलाच कुणी आमदार, खासदार, मंत्री म्हणून मोठा होणार नाही तर दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात उपेक्षितांची सत्ताधारी मानसिकता तयार झाल्यावरच यश मिळेल आणि नेते मोठे होतील.तरीही प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय प्रयोगामुळे मखराम पवार,( खनिकर्म कॅबिनेट मंत्री) डॉ. डि. एम. भांडे.( मत्स्यपालन कॅबिनेट मंत्री.) रामदास बोडखे, ( रोजगार हमी राज्यमंत्री.) हे तिघे मंत्री झाले, प्रा. रणजित मेश्राम हे (खनिकर्म महामंडळाचे) अध्यक्ष झाले. भिमराव केराम,गजाधर राठोड, हरिदास भदे, बळीराम सिरस्कार, वसंत सुर्यवंशी, रामदास बोडखे, डॉ. डि.एम.भांडे, मखराम पवार. हे दहा जण आमदार झाले...!!
बालमुकुंद भिरड.बळीराम सिरस्कार,डॉ.डि.एम.भांडे,श्रावण इंगळे,सौ.पुष्पाताई इंगळे, सौ. संध्याताई वाघोडे. शरद गवई, सौ. साबिया अंजूम सौदागर.असे १९ जिल्हा परिषद अध्यक्ष (राज्यमंत्री पदाचा दर्जा.) झाले.विस्तार भयास्तव नावांची यादी दिली नाही.... !!
जे उपेक्षित जाती समुहातील, अल्पसंख्याक समुहातील,राजकीय विस्थापित वर्गातील, असुनही सत्ताधारी झाले, सन्मानास पात्र ठरले मग अजून कोणतं मोठेपणं पाहिजे होतं.?
सुनील खोब्रागडे यांना राजकारणातील कोणते मोठे पणं अभिप्रेत आहे.??
सम्यक समिक्षा करण्याऐवजी समाजातील सर्वसामान्य जनतेचा बुद्धीभेद करायचा या दृष्ट हेतूनेच सुनील खोब्रागडे यांनी मांडणी केली आहे हेच सिद्ध होते. आणि म्हणून सुनील खोब्रागडे हा द्वेषाने पछाडलेला विकृत बुद्धीचा व्यक्ती आहे हे वास्तव समोर येते…!!
सुनील खोब्रागडे आणखी एक आरोप असा करतात की, प्रकाश आंबेडकर यांचे जुने सहकारी काही नांवांची यादी देऊन कार्यकर्ते/नेते यांच्या राजकीय कारकीर्दीची प्रकाश आंबेडकर यांनी अक्षरशः माती केली...!!.
सुनील खोब्रागडे यांनी त्यामध्ये मखराम पवार यांच्या नावाचा उल्लेख केला आहे, ज्यांना चळवळीने कॅबिनेट मंत्री पदी विराजमान केले आणि तरीही स्वार्थापोटी ते कॉंग्रेस मध्ये निघून गेले त्यांना हाकलून दिले नाही. त्यांची माती त्यांच्या स्वार्थी वृत्तीने केली. प्रकाश आंबेडकर यांच्या वर दोषारोप कशासाठी.?
निलम ताई गो-हे यांच्या नावाचाही उल्लेख आहे, त्यांनी स्वार्थासाठी भारिप, शिवसेना, शिवसेना शिंदे गट असा प्रवास करून आपली निष्ठा सत्तेच्या खुर्चीसोबतं आहे हे सिद्ध करुन दिले आहे.त्यांना मूल्याधिष्ठित राजकारणाशी काही देणेघेणे नाही. त्यांची कुठलीच विचारधारा नाही. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची माती कुणी केली.? हा अगदी सपशेल खोटा आरोप आहे...!!
भिमराव केराम हा आदिवासी अतिशय गरीब कुटुंबातील तरुण त्याला १९९२-९३ साली पोटनिवडणुकीत भारिपच्या कार्यकर्त्यांनी आठवडी बाजारात वर्गणी गोळा करून त्याला किनवटचे आमदार बनविले. तो आमदार झाल्यानंतर ५ कोटी रुपयात शरद पवार यांनी त्याला विकतं घेतले. तो न्युझीलंड चा दौरा करुन आला आणि तो कॉंग्रेस मध्ये गेला. आज पुन्हा सत्तेसाठी तो भाजपमध्ये आहे. अशा दलबदलू, विकाऊ, चळवळीशी गद्दार कार्यकर्त्यांच्या नावाचा उल्लेख करुन सुनील खोब्रागडे म्हणतो प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्ते/नेते यांच्या राजकीय कारकीर्दीची माती केली...!!
सुनील खोब्रागडे हा सम्यक समिक्षा करीत नाही तर समीक्षेच्या आडून प्रकाश आंबेडकर या नेत्याचे प्रतिमा हनन करतोय हे स्पष्टपणे जाणवते, म्हणून तो विकृत बुद्धीचा व्यक्ती आहे....!!
जुने सहकारी म्हणून,अविनाश डोळस, हनुमंत काका ऊपरे,शांताराम बापू पंदेरे यांच्या नावाचाही उल्लेख सुनील खोब्रागडे करतोय . त्यामध्ये शांताराम पंदेरे हे आजही बाळासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत सक्रिय आहेत. ते प्रबुद्ध भारतचे सहसंपादक म्हणून काम पाहतात.अविनाश डोळस शेवटपर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतं एकनिष्ठ राहिले, हनुमंत काका ऊपरे यांनी १० वर्षे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला राजकारणा नंतर धम्म चळवळीत सहभागी होऊन आंबेडकरी चळवळीशी शेवटपर्यंत बांधिलकी जपली तरीही यादी वाढविण्यासाठी सुनील खोब्रागडे यांच्या नावाचा उल्लेख करुन म्हणतो प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्ते/नेते यांच्या राजकीय कारकीर्दीची माती केली हा आरोप किती खोटा आणि बुद्धीभेद करणारा आहे हे सिद्ध होते…!!
अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, रणजित मेश्राम, चंद्रकांत हंडोरे यांनी आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी दाखवतं नवं काहीतरी निर्माण करायला कुणी अडविले होते.?
जसं की, कॉंग्रेस सोडून शरद पवार, मुलायमसिंह यादव, ममता बॅनर्जी यांनी नवं निर्माण करुन आपल्या मध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे हे दाखवून दिले....!!
बसपा सोडून माने, भटकर यांनी नवा पक्ष स्थापन करून आपल्या नेतृत्व गुणांचा परिचय दिला…!!
तसा कुठलाच प्रयोग न करता अविनाश महातेकर अर्जुन डांगळे प्रा रणजित मेश्राम,चंद्रकांत हंडोरे यांनी हेच सिद्ध केले की, त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता नाही, अशा कर्तूत्वहीन लोकांची नांवे घेऊन सुनील खोब्रागडे प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या राजकीय कारकीर्दीची माती केली असा आरोप कोणत्या कारणाने करतात.??
बळीराम सिरस्कार, हरिदास भदे, हे वंचित सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजप, शिवसेना, ऊबाठा गट असे इकडून तिकडे पक्षांतर करीत फिरत आहेत. त्यांची निष्ठा फुले आंबेडकरी विचारधारेशी आहे का.??
अशा अनैतिक तडजोडी करणारे,चळवळीशी गद्दार,कमालीची स्वार्थी वृत्ती बाळगणाऱ्या लोकांचा कैवार घेऊन सुनील खोब्रागडे हा वैचारिक भ्रष्टाचार करीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्व गुणांवर, कार्यशैली वर आणि स्वभाव वैशिष्ट्यांवर अवाजवी शब्दांचा वापर करुन त्यांच्या प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच बरोबर तो आंबेडकरवादी राजकीय चळवळीच्या संदर्भात आंबेडकरी समुहाचा दृष्ट हेतूने बुद्धीभेद करीत आहे आणि म्हणून तो विकृत बुद्धीचा व्यक्ती आहे….!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.