(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-डी.जी.राठोड फाऊंडेशन,दैनिक रोखठोक,आणि सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने२०२४सालचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच कोल्हापूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.याप्रसंगी डी.जी.राठोड फाऊंडेशनच्या वतीने ममता मसुरकर यांना “राष्ट्रीय पुरस्कार२०२४ने” गौरविण्यात आले.इतरही विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्तींनाही सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला डी.जी.राठोड फाऊंडेशनचे डाॅ.सुरेश राठोड,मा.ब्रह्मकुमारी सुनंदा बहनजी,मा.डाॅ.शिवाजीराव शिंदे,मा.डाॅ.मोहन गावकर,मा.रवी पाटील,तसेच दैनिक रोखठोकचे मा.डाॅ.सुरेश अग्रवाल हे उपस्थित होते.विविध अशा लक्ष केलेल्या क्षेत्रात कर्तव्यम सत्कार सोहळ्यात ठाणे-कळवा येथील रायझिंग स्टार शाळेच्या मुख्याध्यापिका मा.ममता मसुरकर यांना”समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार २०२४”प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.ममता मसुरकर या कळवा परिसरात वैविध्य शैक्षणिक,सामाजिक,व वैद्यकीय उपक्रम राबवत आहेत.या पुरस्काराबरोबर विविध सेवाभावी संस्था व वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.ममता मसुरकर यांचे समाजातील योगदान नक्कीच दखल पात्र आहे.समाजासाठी काही चांगले काम करण्याची तळमळ त्यांच्यामध्ये आहे.ममता मसुरकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.