छत्रपती संभाजीनगर- रक्तदान हे सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अनेक रुग्णांना विविध रक्तगटाची तत्परतेने आवश्यकताअसते.रुग्णांसाठी ते जीवरक्षकाची भूमिका बजावते. पुरुषांसाठी दर तीन महिन्यानंतर आणि महिलांसाठी दर चार महिन्यानंतर रक्तदान करता येऊ शकते. याच उदात्त हेतूने प्रेरित होऊन प्रसिद्ध लेखक व ‘आठवणींचे पक्षी’कार स्व. प्र. ई.सोनकांबळे प्रतिष्ठान व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक २४ मे रोजी घाटी रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी साडेदहा वाजता करण्यात आले आहे. इच्छुकांनी रक्तदान शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुमुदिनी सोनकांबळे, डॉ.प्रकाश कदम, डॉ अश्विन सोनकांबळे, डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले आहे.