छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी )दि.२३ बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त भीमटेकडी औरंगाबाद येथे पहाटे तीन वाजता उपासक-उपासिकेच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. भीमटेकडीच्या प्रमुख पूज्य भिक्खूनी प्रा.धम्मदर्शना महाथेरी,भंते संघपाल थेरो, यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी सहा वाजता सुत्रपठन महापरीत्रान पाठ झाले. सकाळी सात वाजता भिख्कुसंघ, श्रामनेर संघ यांच्या वतीने पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी आठ वाजता बालबुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना झाली. शोभाताई माधवराव कोल्हे फाउंडेशन, आकांक्षा सुनील खोब्रागडे, यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.सकाळी नऊ वाजता बुद्धगया येथून आलेल्या बोधी वृक्षांची महापूजा झाली. सकाळी दहा ते बारा वाजेला भिकू संघाला उपासक,उपासिकांना भोजनदान देण्यात आले.संध्याकाळी पाच ते दहा या वेळेत बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.यावेळी भीमशाहीर मेघानंद जाधव,प्रसिद्ध गायिका, राजश्री खरात, भीम शाहिरा पंचशील भालेराव आपली गीते सादर करणार आहेत. जोगेंद्र तायडे, विजय भालमोडे सिंदखेडराजा, संदीप भातपुडे,अशोक जोहरे यांच्यासह उपासक, उपासिका मोठ्या संख्येने भीमटेकडी येथे उपस्थित होते.