निळे प्रतीक न्यूज नेटवर्क – दि.२२
परभणी (प्रतीनिधी) तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शनिवार बाजार येथुन सायंकाळी साडे सहा वाजता बुध्द संदेश मिरवणुक काढण्यात येणार असून जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांच्या हस्ते मिरवणुकीस ध्वज दाखवून प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती धम्म मैत्री संवाद अभियानाचे निमंत्रक संजय बगाटे यांनी दिली.
शहरातील विविध भागातून देखव्यासह अनेक जयंती मंडळे या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
शनिवार बाजार येथून प्रारंभ होनाऱ्या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून विजय वाकोडे, डॉ सिद्धार्थ हत्तीअंबिरे, डॉ सिद्धार्थ भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, पोलीस उप निरिक्षक नालंदाताई लांडगे,मिलिंद सावंत, प्रो डॉ भिमराव खाडे, नागेशदादा सोनपसारे, डी आर तूपसुंदर, सुनिता ताई साळवे, आशाताई खिल्लारे, सुरेश मस्के सुरेश हिवराळे सह आदींची उपस्थिती राहणार आहे.
शनिवार बाजार येथून मुख्य मिरवणुकीत गांधी नगर, संत गाडगेबाबा नगर, पंचशील नगर अजिंठा नगर चे देखावे सहभागी होऊन शिवाजी चौक गुजरी बाजार, गांधी पार्क, आर आर टॉवर, नारायण चाळ कॉर्नर ते स्टेशन रोड मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत जाणार आहे.
या मिरवणुकीत मोठया संख्येने धम्मप्रिय उपासक उपसिका महीला मंडळे यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन धम्म मैत्री संवाद अभियान, नालंदा धम्म विद्यालय, महावंदना सुकाणू समिती, सम्यक संबुद्ध बहुउद्देशीय प्रतिष्ठान विद्रोही फाऊंडेशन अभिरा फाऊंडेशन जेष्ठ नागरिक विचार मंच यांनी केले आहे.