छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ) दि.२२
देशात पुढील वर्षभरामध्ये जवळपास २५ कोटी स्मार्ट मीटर बसविण्याचा सरकारचा मानस आहे. सदरील स्मार्ट मीटरला गुजरात, उत्तर प्रदेश व दिल्ली या ठिकाणी तीव्र विरोध करण्यात आला त्याचे कारण की, सदरील स्मार्ट मीटर बसविल्यानंतर मोबाईलला ज्या पद्धतीने प्रीपेड म्हणजेच अगोदर पैसे भरून नंतर वापर करण्यात येतो त्याच पद्धतीने स्मार्ट मीटर साठी अगोदर पैसे भरावे लागतात त्यानंतर विद्युत वापर करण्यात येतो. वरील तीन राज्यांमध्ये स्मार्ट मीटर माध्यमातून विजेच्या वापरामध्ये व अगोदरच्या मीटरच्या बिलामध्ये दुपटीचा फरक आढळलेला आहे. करिता तेथील स्थानिकांनी मीटर सोबत महावितरणाचे कार्यालय सुद्धा फोडलेले आहेत. गुजरात उत्तर प्रदेश व दिल्ली येथे नागरिकांची मनस्थितीचा अंदाजा घेत तेथील मीटर बसवण्याची प्रक्रिया थंडावली आहे व थेट औरंगाबाद जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसविण्यासाठी योजना सरकारने आखली आहे. स्मार्ट मीटरची चाचणी करून सर्वर इन्स्टॉलेशन बाबत चाचणी सुरू आहे त्यानंतर पुढच्या महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्यात मीटर बसवण्याची सुरुवात करू अशी माहिती महावितरणाचे अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांनी दिली आहे. स्मार्ट मीटर औरंगाबाद जिल्ह्यात बसविण्यात येत असेल तर सद्यस्थितीत येत असणाऱ्या बिलामध्ये दुपटीने फरक होणार आहे करिता वंचित बहुजन आघाडी या स्मार्ट मीटरचा विरोध दर्शवित सहाय्यक अभियंता सचिन लालसरे व उपकार्यकारी अभियंता उच्चदाब विभाग प्रसाद पाठक यांना वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले सोबतच स्मार्ट मीटर सरकारला बसवायचेच असतील तर भाजपच्या सर्व अंध भक्तांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तथा मतदार यांच्या घराला बसवावे अशी मागणी चर्चेदरम्यान शहर कार्यकारी अभियंता यांच्या सोबत करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश गुलाबराव बन, माझं मंगेश निकम, महासचिव मिलिंद बोर्डे, संघटक सुभाष कांबळे, सोशल मीडिया प्रमुख प्रवीण जाधव, ज्येष्ठ नेते जिल्हा सदस्य पंडित तुपे, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब वक्ते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.