दि.२१ मे
आज छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा करण्यात आला.
नेहरू बाल उद्यान येथील स्व.राजीव गांधी यांच्या पुतळ्यास मा.उप आयुक्त अंकुश पांढरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
“आम्ही भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्डा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तिनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवबंधूमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू, तसेच मानवी जिवित आणि मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तीचा प्रतिकार करू.” या प्रतिज्ञेचा अवलंब करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या वेळी सहायक आयुक्त अशोक गिरी,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद ,स्वच्छता निरीक्षक सुभाष भाले,सतीश दाभाडे,उद्यान विभगाचे राऊत,जनसंपर्क विभागाचे करण साळवे आदींची उपस्थिती होती.
दि.२१ मे