प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगर. दि २१
तुम्ही कितीही एसआयटी लावा, आरोप करा, गुन्हे दाखल करा, आता माघार नाही. असे म्हणत चार जूनपासून आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सग्या सोयऱ्यांबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीसाठी हा लढा सुरू आहे.असेही त्यांनी पत्रकार परिषदेत २० मे रोजी स्पष्ट केले. पाटील पुढे म्हणाले की, काही ठिकाणी अधिकारी मनमानी करत प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत. परंतु,मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांची आपण गेल्या आठवड्यात भेट घेतली. तेव्हा ते म्हणाले की, शासकीय कर्मचारी निवडणुकीत व्यग्र असल्याने प्रमाणपत्राला थोडा विलंब होत असून आचार संहितेनंतर २० तारखेपासून प्रक्रिया गतीने सुरू होणार आहे. असे त्यांनी सांगितल्याचे जरांगे पाटील म्हणाले. ४ जूनला उपोषणास बसल्यानंतर काय परिस्थिती असणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.