छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी ) दि.२०
अर्जित रजा रोखीकरण रकमेसाठी लाच मागणाऱ्या संस्थाचालकाला उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी जोरदार दणका देत एक लाख रुपयाचा दंड थोटावला आहे. दंड न भरल्यास वारंट जारी करणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.नगाव एज्युकेशन सोसायटी नगाव अंतर्गत सौ. एस. डी भदाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमडाळे ता. धुळे ही शाळा चालविली जाते. अहंकारी संस्थाचालक शाळेतील कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक छळ करीत आहे. नोकरीवर घेतांना देणगी घ्यायची व पुढे प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे दाखवत, शिक्षक मान्यता घेणे, शाळेचे ऑडिट, लाईटबील,इत्यादी कर्मचाऱ्यांकडून वसुल केले जातात. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याचे पेन्शन सुरु करण्यासाठी व अर्जित रजा रोखीकरण तसेच सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमा यासाठी पैशाची वेगळी मागणी करतात. पैसे न दिल्यास तुमच्या सर्व्हिसमध्ये खंड आहे असे कारण दाखवून देतात. अनेक प्रकारे या संस्थामार्फत कर्मचाऱ्याना छळले जाते.शिक्षकांचे अनेक वर्षापासून पेन्शन प्रकरणे प्रलंबित आहेत. सदर रकमा संस्थेकडे पडून आहेत. या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक संप्रति बळसाने यांनी त्यांचे अर्जित रजा रोखीकरणाची रक्क्म संस्थेने अडवून ठेवल्याने त्यांनी अँड . अनुदिप दिलिप सोनार यांचे मार्फत उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे (WP/15046) ही रिट याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या Division Bench चे न्यायमूर्ती वि.भा. कणकणवाडी व न्यायमूर्ती एस. जी.चपळगावकर यांनी हे प्रकरण निकाली काढले. त्यात सदर संस्थेने अर्जित रजा रोखीकरणाची रक्क्म देण्यास १वर्ष उशीर केल्यामुळे सदर संस्थेला कोर्टाने १लाख रुपये दंड हा संप्रती बळसाने यांना २ आठवड्यात देण्याचे आदेशीत केले आहे. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास संस्था चालक व मुख्याध्यापक यांचे विरुद्ध वॉरंट जारी करावे असे आदेश दिलेले आहेत. शिक्षकाकडून लढणारे प्रसिध्द विधिज्ञ अनुदीप सोनार हायकोर्ट औरंगाबाद यांनी ४ महिन्यात हे प्रकरण निकाली काढून घेतले.लाचखोर संस्थाचालकास ही मोठी चपराक आहे. या आदेशाचा फायदा इतर पीडित शिक्षकांना देखील होईल.