रिपब्लिकन युवा मोर्चाचे विभागीय आयुक्तालयासमोर जोरदार निदर्शने
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले परंतु आता पोलीस कोंबिंग ऑपरेशन करून दलित तरुणावर नाहक गुन्हे दाखल करीत आहे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे या मागणीसाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने आज बुधवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून मागणीचे निवेदन दिले परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची समाजकंटकाने तोडफोड केली या घटनेमुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी समाजाने आंदोलन केले परंतु आता पोलीस कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली दलित तरुणांची धर पकड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत आहे या प्रकारामुळे आंबेडकरी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाप्रमुख जयकिशन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी आणि पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबण्यात यावे या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला त्यानंतर एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले परभणी येथे झालेल्या घटनेची सखोल चौकशी सीबीआय मार्फत करावी कायदा व सुव्यवस्था आबादी ठेवून शासन प्रशासना सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करावे पोलिसांनी विनाकारण कोंबिंग ऑपरेशन बंद करून जनतेस शांततेचे आवाहन करावे आंबेडकरी जनतेने बंद पुकारल्यास पोलिसांनी बनला सहकार्य करावे 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिवस आहे त्या अनुषंगाने देशभरातून आंबेडकरी अनुयायी शौर्य स्तंभास मानवंदना देण्यासाठी येतात त्या ठिकाणी उपाययोजना करून राज्यात शांततेचे वातावरण निर्माण करावे मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाप्रमुख जय किशन कांबळे डॉ. कृष्णा राठोड , कुणाल घोरपडे , राजाभैय्या पटेल , प्रा. जयश्री शिर्के , स्वप्नील खंडागळे शैलेश चाबुकस्वार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते…!