परभणी जिल्ह्यातील दलित समाजावरील अत्याचाराच्या प्रकरणावर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या संदर्भात, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी दोन वेळा दूरध्वनीवरून चर्चा केली.
दलित अटकेला विरोध आणि कोम्बिंग ऑपरेशन थांबवण्याची मागणी
बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना दलितांच्या अटकेची प्रक्रिया थांबवण्याची तसेच दलित वस्तीवर सुरू असलेल्या कोम्बिंग ऑपरेशनला त्वरित अंत देण्याची मागणी केली. या प्रकरणात दलितांना विनाकारण लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप करत त्यांनी पोलिस प्रशासनावर कडक कारवाईची मागणी केली आहे. शांततेचे आवाहन करुन,परिस्थिती संवेदनशील असल्याचे लक्षात घेऊन, बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व दलित आणि संविधानवादी जनतेला शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. “आपला लढा शांततेतून आणि संविधानाच्या चौकटीत राहून व्हावा,” असे आवाहन त्यांनी केले.अटक न झाल्यास पुढील निर्णयाची घोषणा केली जाइल.
“जर संविधानाची विटंबना करणाऱ्या दोषींना उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अटक झाली नाही, तर मी पुढे काय करावे हे ठरवेल आणि जाहीर करीन,” असा इशाराही बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला.या घटनेवर दलित समाजात तीव्र असंतोष आहे. आता मुख्यमंत्री आणि प्रशासन यावर काय भूमिका घेतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.