6 डिसेंबर 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून समता सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रेल्वे स्थानकावरील नागरिकांना अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश नरवडे, उपाध्यक्ष संदीप भोकरे पाटील, सचिव संतोष भुरीवाले, कार्याध्यक्ष योगेश हिवराळे तसेच सदस्य दुर्गेश राऊत व इतर सहकारी मित्रांनी अन्नदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली
संस्थेच्या वतीने अन्नदान कार्यक्रमामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारांचा आदर्श घेऊन गरजू लोकांना सहकार्य करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा निर्धार केला.
रेल्वे स्थानकावर उपस्थित नागरिकांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले, तसेच संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल आभार व्यक्त केले.