———————————————————–पुणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)गुन्हेगार हा मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसतो,परिस्थिती त्या व्यक्तीला गुन्हेगार बनवते मग पुरुष असो वा स्त्री.जेलमध्ये प्रवेश केल्यानंतर जेल प्रशासन त्यांच्यावर त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती जाण्यासाठी वेगवेगळ्या समुपदेशन कार्यक्रम घेऊन सकारात्मक बदल घडवुन आणण्याचा प्रयत्न करते.त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील येरवडा जेलमधील महिला बंदी साठी महिला दिना निमित्त आगळा वेगळा कार्यक्रम जेल मध्ये आयोजित करण्यात आला होता.गोल्डन लेटर्स बाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डाॅ.राणी खेडीकर यांनी कार्यक्रमास सुरुवात केली.या कार्यक्रमास प्रज्ञा दीप सोशल फाऊंडेशनचेही सहकार्य लाभले.प्रज्ञा दीप फाऊंडेशनकडुन वैशाली गायकवाड आणि प्रज्ञा रोकडे उपस्थित होत्या.यावेळी महिला बंदीचे समुपदेशन करण्यात आले.येरवडा जेल महिला बंदी साठी हा कार्यक्रम संस्कार भारती यांनी अतिशय सुंदर अर्थपूर्ण पद्धतीने सादर केला.जिजाऊ,सावित्रीबाई फुले यांसारख्या कर्तृत्ववान स्रियांची गाथा पोवाड्यातून सर्व महिला कलाकारांनी सादर केली.कार्यक्रमाला मा.तुरुंग अधिकारी सुनिल ढमाल सर आणि अतिरिक्त निरीक्षक मा.पल्लवी कदम मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते.एडवोकेट.अनिषा फणसाळकर यांनी महिलांचे मानसिक आरोग्य यावर मार्गदर्शन केले.ढमाले सरांनी उत्तम मार्गदर्शन केले आणि सर्व महिला बंदीना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कदम मॅडम यांनी कार्यक्रमाची सांगता केली.